Pune : अजित फाऊंडेशनने साकारली अनोखी भाषा रेल; मुलांचा भाषिक प्रवास होणार सुकर

एमपीसी न्यूज : राष्ट्रीय संपादणुक पाहणीत राज्यातील तिसरीच्या (Pune) 30 टक्के मुलांना वाचता येत नसल्याचे निष्पन्न झाले आहे, तर पाचवीच्या 45 टक्के मुलांना त्यांच्या इयत्तेला अनुसरून लिहिता येत नसल्याचे आढळून आले. यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतर्फे राज्यभरातील सर्व शाळांनी आठवड्यातून दोन तास वाचनासाठी द्यावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागून त्यांचे लेखन कौशल्य सुधारेल अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. गेल्या 4 वर्षांपासून अजित फाऊंडेशन संस्थेतर्फे वाचता न येणारी, अभ्यासात मागे असलेली, शाळाबाह्य किंवा वयानुरूप प्रवेशित मुलांसाठी लँग्वेज ट्रेन अर्थात भाषा रेल हा उपक्रम राबवला जात आहे.

या उपक्रमात सुरुवातीला मुलांची वाचन पातळी तपासणी करण्यात येते. त्यानुसार मुलांचे गट तयार केले जातात. वाचन पातळी ही तिकीट खिडकी समजली जाते. तिथून प्लॅटफॉर्म क्र. 5 ते प्लॅटफॉर्म क्र. 1 हा प्रवास सुरु होतो.

भाषा रेलमध्ये मुळाक्षरे ओळख, चौदाखडी, जोडाक्षर शब्द वाचन, वाक्य वाचन या माध्यमातून एकूण 5 स्टेशन पर्यंत भाषा रेल धावते.

वाचन-लेखन स्टेशन ते मूल्यमापन स्टेशन मुलांचा भाषिक प्रवास होणार सुकर –

वाचन हे भाषा विकासातील एक म्हत्वाचे कौशल्य आहे. ते ऐकणे (Pune) आणि बोलणे या कौशल्यावर आधारित आहे. तसेच वाचन करण्यासाठी अगोदर ऐकणे, बोलणे हे कौशल्य विकसित होणे महत्वाचे आहे.

मुलांना जर वाचता आले नाही तर ते निराश होऊ शकतात किंवा त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. मुलांचे वाचन आकलन व लेखन सुधारण्यासाठी अधिक प्रयत्न केले जातात. यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम विकसित केला आहे. यात मुलांना अनुक्रमे शब्द, वाक्‍य, लघू परिच्छेद, दीर्घ परिच्छेद, तसेच अक्षर लेखन ते सुलेखन सराव घेण्यात येतो.

”मुले भाषेतील संवाद ऐकून, उच्चारणाचा सराव करू शकतात. तसेच उच्चारणांतील चुका निदर्शनास आणून सुधारणा करू करता येतात. त्यानंतर वाचन आणि लेखनकौशल्य मुलांना आत्मसात करता येईल. यासाठी भाषा रेल अर्थात भाषा प्रयोगशाळा हा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे.” – महेश निंबाळकर, अध्यक्ष-अजित फाउंडेशन,बार्शी

संवाद स्टेशनमध्ये मुले गटांमध्ये सचित्र कार्ड वरील गोष्टी सांगतात, तसेच चित्र पाहून गोष्टीचे वर्णन करतात. यात मुलामुलांध्ये संवाद होतो. ऐकलेल्या गोष्टींवर प्रश्न विचारणे, गोष्ट लिहणे, लिहलेली गोष्ट वाचून दाखवणे अशा विविध कृती केल्या जातात.

यामुळे मुलांना कितपत आकलन झाले हे लक्षात येते. श्रवणकौशल्यांच्या आधारे सोप्या पद्धतीने विविध भाषा शिकता येतात. पुढे, कथा स्टेशनमध्ये मुले कॅमेराच्या समोर किंवा ध्वनिमुद्रणाच्या मदतीने गोष्टी सांगतात, त्यामुळे मुलांना कॅमेरापुढे बोलण्याचे धाडस, शब्दोच्चार, आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होते.

Today’s Horoscope 29 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

भाषा प्रयोगशाळेमुळे मुलांना अभिव्यक्त होण्याची संधी मिळते. सराव व मूल्यमापन स्टेशनमध्ये मुलांच्या वाचन, लेखन क्षमतांचा कितपत विकास झाला आहे, याचा सराव केला जातो. तसेच मुलांनी साध्य केलेल्या गोष्टींचा अधिक सराव यात समाविष्ट आहे. या उपक्रमातून मुलांचे मूल्यमापन केले जाते.

बोलीभाषा व मराठी भाषा यातील शब्द अतिशय वेगळे आहे. भाषा रेल मुले मला वाचन लेखन सराव झाला. कॅमेरापुढे गोष्टी सांगण्यामुळे आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे बोलताना अथवा संवाद साधताना दडपण जाणवत नाही. सचिन पवारविद्यार्थी

अजित फाऊंडेशनने 90 दिवसांत मुलांना वाचन लेखन कौशल्य विकास व्हावा, यासाठी भाषा रेल हा उपक्रम डिझाईन केला आहे. त्यामध्ये अभ्यासक्रम, शैक्षणिक साहित्य, सराव पुस्तिका समावेश केला आहे.

वर्षभर कथाकथन-कथा पुनर्कथन या माध्यमातून हा उपक्रम सुरु असतो. तसेच ‘मित्र-वर्तमानपत्र’ या संकल्पनेतून मुलांचे वाचन गट करून नियमित वर्तमानपत्रातील सकारात्मक बातम्यांचे प्रकट वाचन केले जाते. यामुळे मुलांना नवनवीन शब्दांची माहिती होते.

तसेच श्रवण-वाचनातील नवीन शब्द फलकावर लिहले जातात. अशा नवीन शब्दांची ओळख, समानार्थी व विरुद्धार्थी शब्दांचे अर्थ, समजून घेत त्यांचा वापर दैनंदिन संवाद व लेखनात करण्याचा आग्रह असतो. मुलांची शब्दसंपत्ती वाढण्यास मदत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.