Today’s Horoscope 30 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 30 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शनिवार.

30.09.2023.

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष- द्वितीया श्राद्ध.

राहू काळ – सकाळी 9.00 ते  10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – रेवती 21.08 पर्यंत नंतर अश्विनी.

चंद्र राशी – मीन 21.08  पर्यंत नंतर मेष.

————————————

मेष – ( शुभ रंग- पांढरा )

आज दिवसच खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही नको. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. गरजूंनाही तुम्ही आज सढळ हस्ते मदत कराल.

वृषभ (शुभ रंग- गुलाबी )

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील. दिवसाच्या पूर्वार्धात लाभ संभवतो.

मिथुन ( शुभ रंग- लाल )

आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्यस प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कुटुंबीयांना वेळ देणे आज तुमच्यासाठी अवघड होईल.

कर्क (शुभ रंग- मोरपंखी )

आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्रीच बाळगा. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे मनात येईल. वडीलधाऱ्यांचा मान राखाल.

सिंह (शुभ रंग- हिरवा )

आज कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. हितशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतात. कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. सावध रहा.

कन्या ( शुभ रंग- मरून)

कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज कार्यक्षेत्रातही आपले महत्त्व सिद्ध करू शकाल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची खंबीर साथ राहील.

तूळ ( शुभ रंग- निळा )

कोणतीच गोष्ट आज सहज साध्य नसली तरीही आज तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.

वृश्चिक (शुभ रंग- चंदेरी)

कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल. आज बरेच दिवसांनी जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात रमाल.

धनु- (शुभ रंग- भगवा )

आज काही घरगुती प्रश्नात लक्ष देणे गरजेचे वाटेल. मुलांच्या अभ्यासातही डोकावणे आवश्यक आहे. काही रसिक मंडळी सहकुटुंब एखाद्या सहलीचे आयोजन करतील.

मकर ( शुभ रंग- मोतिया )

शेजाऱ्यांशी झालेले मतभेद दूर होऊन सलोखा वाढेल. काही जणांना आज तातडीने प्रवासासाठी निघावे लागेल. घराबाहेर क्रोधावर लगाम असलेला बरा. मुलांनी आईच्या अज्ञात राहावे.

कुंभ (शुभ रंग – पांढरा)

खर्च कितीही वाढला तरी पैसा कमी पडणार नाही. आज संध्याकाळी काही येणी असतील तर अनपेक्षित पणे वसूल होतील. महत्त्वाच्या कामासाठी थोडी भटकंती होईल.

मीन -(शुभ रंग – आकाशी)

आज भावनेच्या भरात तुम्ही काही चुकीचे निर्णय घेऊ शकता. उपवारांना सुयोग्य स्थळांचे प्रस्ताव येणार आहेत. एखाद्या समारंभात तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव राहील.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.