NCP : राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी; दोन्ही गटाकडून पर्यायी चिन्हाबाबत चाचपणी सुरु

एमपीसी न्यूज – जुलै महिन्यामध्ये (NCP) राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह पक्षातील दिग्गज नेते आणि आमदारांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यानंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये शरद पवार गट, अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले. या दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा सांगण्यात येऊ लागला.
अजित पवार गटाकडून पक्षाचे अध्यक्ष अजित पवार असल्याचे सांगत दोन तृतीयांश आमदार आणि खासदार आपल्याकडे असल्याने पक्ष आणि चिन्ह आपल्याच गटाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आहेत.
शिवाय त्यांची राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी लोकशाही मार्गाने निवडणुकीच्या माध्यमातून निवड झाली आहे. त्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच असून पक्ष आणि चिन्ह त्यांचाच असल्याचा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे.
Pune : पिंपरी चिंचवड मधील हॉटेल व्यवसायिकाचा पुण्यामध्ये खून
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापुढे असून त्याबाबत येत्या 6 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. तथापि, दोन्ही गटातील (NCP) नेत्याकडून पक्ष आणि चिन्ह आपल्याच गटाला मिळेल असा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, केद्रीय निवडणूक आयोगापुढील सुनावणी निर्णय आपल्या विरोधात लागल्यास अथवा केद्रीय निवडणूक आयोगाकडून पक्षाचे घड्याळ चिन्ह गोठवल्या गेल्यास आपल्या गटाचे पर्यायी चिन्ह काय असावे, याबाबत दोन्ही गटाकडून चाचपणी सुरु झाली असून तज्ञांसोबत चर्चाही सुरु झाली आहे.