Narayangaon Women Murder : महिलेचा खून मुलाने नाही, तर नवऱ्याने केला; मुलाच्या आजाराचा घेतला फायदा

एमपीसी न्यूज : दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील नारायणगाव (Narayangaon Women Murder) तालुक्यातून खुनाचा प्रकार उघडकीस आला होता. डोक्यात खोऱ्याने वार करून एका ज्येष्ठ महिलेचा खून करण्यात आला होता. तंबाखूसाठी पैसे न दिल्याने मुलानेच हा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणाला आता नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. या महिलेचा खून तिच्या मुलाने नाही तर पतीने केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. नारायणगाव पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

अंजनाबाई बारकू खिल्लारी (वय 60) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पती बारकू सखाराम खिल्लारी याला पोलिसांनी अटक केली आहे.

Khadki Crime : बायकोसह सासरच्या लोकांचा त्रास; जावयाने घेतला गळफास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारकू आणि अंजनाबाई यांना दोन मुले आहेत. दोन्हीही मुले गतिमंद आहेत. हे सर्व नारायणगाव तालुक्यातील शिरोली तर्फे आळे येथे राहतात. शेती करून उदरनिर्वाह करतात. दरम्यान शेती विकण्याचा निर्णय बारकू यांनी घेतला होता. मात्र, पत्नी अंजनाबाई यांनी त्याला विरोध दर्शवला होता. या कारणावरून त्यांचे भांडण झाले. आणि रागाच्या भरात बारकू यांनी अंजनाबाई यांच्या डोक्यात खोऱ्याने वार करून त्यांचा खून केला.

खून झाल्यानंतर त्याने गतिमंद मुलगा अमोल याने हा खून (Narayangaon Women Murder) केल्याचा बनाव रचला. यासाठी अंजनाबाईने तंबाखूसाठी पैसे न दिल्याचा कांगावाही त्यांनी केला होता. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना वेगळाच संशय होता. त्यामुळे त्यांनी बारकू याची कसून चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबूल केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.