Khadki Crime : बायकोसह सासरच्या लोकांचा त्रास; जावयाने घेतला गळफास

एमपीसी न्यूज : पत्नी आणि सासरच्या लोकांच्या (Khadki Crime) त्रासाला कंटाळून एका 38 वर्षीय व्यक्तीने आयुष्य संपवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्याच्या खडकी परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी आता या व्यक्तीच्या पत्नीसह सासू-सासरे आणि मामा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर निवृत्ती नाईक (वय 38) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. समीर यांचे वडील निवृत्ती भगवंत नाईक (वय 65) यांनी खडकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्यादी दिली आहे.

Amol Kolhe : अमोल कोल्हे यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले, पुन्हा नाराजीच्या चर्चा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरची पत्नी आणि त्याच्या सासरकडची लोक त्याच्याकडे (Khadki Crime) वारंवार पैशाची मागणी करत होते. समीरने पत्नीला दहा लाख रुपये दिले होते. मात्र, आणखी पैसे देण्यात यावेत या मागणीसाठी त्याचा मानसिक छळ सुरू होता. याच त्रासाला कंटाळून समीरने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. मात्र, समीरच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.