Moshi : टँकर मधील डांबराला लागली आग

एमपीसी न्यूज – टॅंकरमधील डांबराला आग (Moshi) लागली. ही घटना शुक्रवारी (दि. 6) सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आज तात्काळ आटोक्यात आणली.

अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गिलबिले नगर येथे डांबराच्या टॅंकरला (एमएच 14/एफ 5684) आग लागली आहे, अशी माहिती सागर गाडेकर यांनी अग्निशमन विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच मोशी अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी फोम व पाण्याच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले.

Pune : गांधीजींना स्वच्छ भारत अभियान पुरते मर्यादित ठेवणे चुकीचे- सुधींद्र कुलकर्णी

स्टेशन ऑफिसर विनायक नाळे, लीडिंग फायरमन लक्ष्मण होवाळे, नवनाथ पवार, पंकज रसाळ, पवान पवार, कृष्णा राठोड या (Moshi) जवानांनी ही कामगिरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.