Moshi Crime News : पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेल्याने एकास मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या एका व्यक्तीला चार जणांनी मिळून दुकानात घुसून मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 9) सकाळी सहारा वजन काटा दुकान, देहूरस्ता मोशी येथे घडली.

शकील अहमद अब्दुलखैर खान (वय 48, रा. आकुर्डी) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशपाक (रा. कुदळवाडी) आणि त्याचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीसोबत झालेल्या जुन्या भांडणाची तक्रार देण्यासाठी फिर्यादी पोलीस ठाण्यात गेले होते. त्या कारणावरून आरोपींनी सोमवारी सकाळी साडेसात वाजता फिर्यादी यांच्या सहारा वजन काटा या दुकानात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी देत ‘पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी का गेला होता’ असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.