Pimpri News: शहरात आज 227 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज, 211 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 211 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 227 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरात आजमितीला एकूण 772 सक्रिय रुग्ण आहेत.

शहरातील 3 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 4 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 367 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 66 हजार 474 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 772 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 218 रुग्ण गृहविलगीकरणात असून 554 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 51 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 448 आहेत. आज दिवसभरात 7 हजार 904 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 11 लाख 88 हजार 565 जणांनी लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.