Moshi News : यात्रेनिमित्त मोशीत वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज  – मोशी गाव येथे यात्रेनिमित्त ( Moshi News ) रविवारी (दि. 19) भंडारा आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी परिसरातील हजारो भाविक येत असतात.

त्यामुळे पुणे-नाशिक महामार्ग आणि मोशी परिसरातील वाहतुकीत रविवारी (दि. 19) आणि सोमवारी (दि. 20) दुपारी चार ते रात्री साडेअकरा या वेळेत बदल करण्यात आले आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी आदेश दिले आहेत.

डायमंड चौक चिखली येथून देहूफाटा (भारतमाता चौक) पुणे नाशिक महामार्ग मोशीकडे जाणाऱ्या मार्गावर अवजड वाहनांना बंदी आहे. ही वाहने डायमंड चौकातून पवार वस्ती, स्पाईन रोडने जातील.

Pimpri News : क्रीडापटूंच्या तंदुरुस्तीसाठी योगोपचार उपयुक्त – डॉ. श्रीराम सावरीकर

आळंदी देहूफाटा चौक, आळंदी येथून देहूफाटा (भारतमाता चौक) पुणे नाशिक महामार्ग, मोशीकडे जाणाऱ्या मार्गावर अवजड वाहनांना बंदी असून ही वाहने आळंदी देहू फाटा चौकातून ( Moshi News ) विश्रांतवाडी रोडने अलंकापुरम चौकातून पांजरपोळ चौक (जय गणेश साम्राज्य चौक) येथून जातील.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.