Pimpri News : क्रीडापटूंच्या तंदुरुस्तीसाठी योगोपचार उपयुक्त – डॉ. श्रीराम सावरीकर

एमपीसी न्यूज  – क्रीडापटूंची शारीरिक मानसिक तंदुरुस्ती साठी ( Pimpri News) योगोपचार आणि आयुर्वेदिक औषध उपचार उपयुक्त आहेत. क्रीडापटूंनी फसव्या उपचार पद्धती तसेच चुकीच्या मार्गदर्शकांपासून लांब राहिले पाहिजे. अन्यथा त्यांची कारकीर्द धोक्यात येऊ शकते, असे मत जामनगर विद्यापीठाचे निवृत्त प्रकुलगुरु डॉ. श्रीराम सावरीकर यांनी व्यक्त केले.

डॉ. महेश देशपांडे, आयुर्वेद व्यासपीठचे वैद्य उदय जोशी, वैद्य मेधा देवळेकर, वैद्य दीप्ती धर्माधिकारी, गुरुकुल प्रमुख आदित्य शिंदे, क्रीडा प्रशिक्षक भगवान सोनवणे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. परिषदेस क्रीडा क्षेत्रातील शिक्षक, मार्गदर्शक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्ञानप्रबोधिनी क्रीडाकूलच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या मान्यतेने आयुर्वेद व्यासपीठ आणि महाराष्ट्रीय मंडळ यांच्या सहयोगाने शनिवारी दोन दिवसीय राष्ट्रीय आयुर्वेद क्रीडा परिषदेचे उद्घाटन डॉक्टर सावरिकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

Daund News : दौंड हत्याकांडातील दोन लहान मुलांचे ही मृतदेह सापडले

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, अर्जून पुरस्कार प्राप्त नेमबाज राही सरनोबत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, आगाशे महाविद्यालयाचे डॉ. सोपानराव कांगणे, ज्ञान प्रबोधिनीचे सचिव सुभाष राव, मोहन गुजराथी, प्राचार्य मनोज देवळेकर आदी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य मनोज देवळेकर यांनी लिहिलेल्या ‘विजेता’ डीकोडिंग दी न्युट्रिंग ऑफ ॲथलिट या पुस्तकाचे प्रकाशन ( Pimpri News) मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

खासदार बारणे म्हणाले आयुर्वेद उपचार पद्धती ही हजारो वर्षांपूर्वीची आहे. मेडिकल सायन्स कितीही पुढे गेले तरी आयुर्वेदाला जगन मान्यता मिळालेली आहे. या परिषदेमध्ये क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक, खेळाडू यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. याचा उपयोग पुढील वाटचालीसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला.

ऑलम्पिक मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना ‘ॲण्टी डोपिंग’ चाचणीत ठराविक ॲलोपॅथिक औषधे वापरण्यास परवानगी आहे. मात्र आयुर्वेदिक औषधांचा यामध्ये समावेश केलेला नाही. आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक औषधे आणि उपचारांचा ऑलिम्पिकसाठी समावेश करण्यात यावा त्यासाठी आयुष मंत्रालयाने पाठपुरावा करावा अशी अपेक्षा राही सरनोबत ने व्यक्त केली.

यावेळी प्राचार्य मनोज देवळेकर यांनी स्वागत केले. ॲड. प्रतिभा जोशी दलाल, डॉ. राजीव नगरकर यांनी सूत्रसंचालन तर सुभाष देशपांडे यांनी आभार ( Pimpri News) मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.