Lohegaon : मोटारचालकाला लुटून मारहाण

एमपीसी न्यूज : लोहगाव (Lohegaon) विमानतळ परिसरात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एका तरुण वाहनचालकाला मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी प्रतिक रणवरे (वय 22, रा. येवलेवाडी, कोंढवा) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चालक रणवरे रात्री प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या थांब्यावर जात होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांना अडवले. मोटार नीट चालवत नाही का, अशी विचारणा करून चोरट्यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. रणवरे यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेली. कारमध्ये ठेवलेली रोकड लुटून ते पळून गेले.

याबाबत कोणाला माहिती दिल्यास विमानतळ (Lohegaon) परिसरात प्रवाशांची वाहतूक करू देणार नाही, अशी धमकी देऊन चोरटे पसार झाले. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत रणवरे जखमी झाले. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक तपास करत आहेत.

Today’s Horoscope 19 October 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.