Pune Crime : डेटिंग ॲपवर झालेल्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागितली

एमपीसी न्यूज : एका डेटिंग ॲपवर (Pune Crime) ओळख झाल्यानंतर 37 वर्षे तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. इतकेच नाही, तर या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ तयार करून, हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत या तरुणीकडून पैसे देखील उकळण्यात आले. विमानतळ पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकाश सक्सेना (वय 38, रा. रोहन मिथिला, विमाननगर) नामक तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 37 वर्षीय तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली.

Hadapsar Crime : हडपसरमध्ये जर्सी गाईवर अनैसर्गिक अत्याचार, अल्पवयीन तरुणाचे घृणास्पद कृत्य

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 2018 मध्ये फिर्यादी तरुणी आणि आरोपी यांची टिंडर या डेटिंग ॲपच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. फिर्यादी तरुणीच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत अनैसर्गिक संबंधही आरोपीने ठेवले. आरोपीने फिर्यादी यांच्या नावावर विविध बँकातून लोनही काढले आहे. शारीरिक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने फिर्यादी यांच्याकडे चार लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.