Hadapsar Crime : हडपसरमध्ये जर्सी गाईवर अनैसर्गिक अत्याचार, अल्पवयीन तरुणाचे घृणास्पद कृत्य

एमपीसी न्यूज : पुण्यातील (Hadapsar Crime) हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने जर्सी गाईवर लैंगिक अत्याचार केला. घराच्या पाठीमागे अंगणात बांधलेल्या या गाईचे पाय बांधून या तरुणाने हे संतापजनक कृत्य केलं आहे. 13 डिसेंबरच्या पहाटे हा सर्व प्रकार घडला. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले आहे.

Talwade : तळवडे व आसपासच्या परिसरात सकाळपासून विद्युत पुरवठा खंडीत; नागरिकांना त्रास

याप्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, फुरसुंगीतील कामठे अळी परिसरात राहणाऱ्या एका 27 वर्षे तरुणाने तक्रार दिली आहे. या तरुणाने घराच्या पाठीमागील अंगणात आपली (Hadapsar Crime) जर्सी गाय बांधली होती. दरम्यान आरोपी तरुण हा गायीचे पाय बांधून गाईसोबत अनैसर्गिक अत्याचार करताना सापडला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन गाठत संबंधित तरुणाविरोधात तक्रार दिली आहे. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करत संबंधित अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.