Talwade : तळवडे व आसपासच्या परिसरात सकाळपासून विद्युत पुरवठा खंडीत; नागरिकांना त्रास

एमपीसी न्यूज : तळवडे व आसपासच्या परिसरात (Talwade) आज सकाळपासून विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने दिवसभर लघु उद्योग व नागरिकांना त्रास सहन करावा लागला. तळवडेमधील एका नागरिकाने सांगितले, की आज तळवडेमधील सकाळी ज्योतिबानगर परिसरात पावणे अकरा वाजल्यापासून विद्युत पुरवठा खंडीत आहे. त्यामुळे येथील लघु उद्योजकांना खूप त्रास सहन करावा लागला.

स्थानिक नागरिक नरेंद्र भालेकर म्हणाले, की ज्योतिबानगर औद्योगिक क्षेत्रामध्ये सुमारे हजार ते बाराशे कंपन्या आहेत. त्यांचा आज सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित होता. त्यामुळे लघुउद्योजकांना त्यांच्या कामगारांना आज काम न करता देखील पगार द्यावा लागला आहे.

सुरेश म्हेत्रे (माजी अध्यक्ष, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना व माजी नगरसेवक) म्हणाले, की ”त्रिवेणीनगरमधील रहिवाशांना सकाळपासून विद्युत पुरवठा नसल्याने खूप त्रास सहन करावा लागला. त्रिवेणीनगर मधील रहिवासी म्हणाले, की काही नागरिकांचे वर्क फ्रॉम होम चालू आहे. त्यांना याचा खूप त्रास सहन करावा लागला. घरातील विद्युत उपकरणे जसे मिक्सर, इस्त्री, टी व्ही, फ्रिज व ओव्हन वापरता न आल्याने दैनंदिन कामकाज करणे कठीण झाले. विद्युत मोटर न चालल्याने खालच्या टाकीतून टेरेसच्या टाकीत पाणी चढले नाही. त्यामुळे रहिवाश्यांना पाणी खालून आणावे लागले.

PCMC News: नोकर भरती! 386 जागांसाठी 85 हजार 771 अर्ज पात्र, परिक्षा शुल्कातून मिळाले 7 कोटी

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संपर्क केल्यावर सांगितले, की काही (Talwade) कामासाठी यमुनानगरमध्ये बजाज कंपनीच्या गेटजवळ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने रस्त्याचे खोदकाम सकाळी दहा वाजेच्या सुमारास करण्यात आले. यामुळे यमुनानगर फिडरच्या विद्युत केबल्स तुटल्या. त्यामुळे 10 वाजल्यानंतर यमुनानगर फिडरहून विद्युत पुरवठा होणाऱ्या भागांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. आज रात्री 8 वाजेच्या दरम्यान विदयुत पुरवठा सुरु करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.