Talewade : रेडझोन हद्दीतील एमआयडीसीच्या इमारतीत होणार हॉस्पिटल;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

एमपीसी न्यूज – तळवडे येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास (Talewade)महामंडळाची जागा उपलब्ध आहे. एमआयडीसीच्या A-34 या 17940 चौरस मीटर या भूखंडावर बांधलेली 10510 चौ.मी चटई क्षेत्राची इमारत विनावापर शिल्लक आहे. ती इमारत सुस्थितित असुन त्यामध्ये कायदेशीर बदल करून या इमारतीत हॉस्पिटल सुरु करण्याची मागणी माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील तळवडे, रुपीनगर, (Talewade)ज्योतीबानगर, त्रिवेणीनगर, गणेशनगर, ताम्हाणेवस्ती तसेच सहयोगनगर हा परिसर शहरापासुन दुर असल्याने या परिसराकरीता जवळचे मनपाचे कोणतेही हॉस्पिटल नाही. तसेच तळवडे व चिखली परिसर देहू कॅन्टेन्मेंटच्या 2000 यार्डाच्या परिघात येत असल्याने येथे कोणतेही बांधकाम अनुज्ञेय नसुन आरक्षणे विकसित करणेत येत नाहीत. या भागात पुर्वीपासुन या भागात राहणाऱ्या पुर्वीच्या रहिवाशांना आरोग्य विषयक मुलभुत सुविधा पुरविण्यास अडचण निर्माण झालेली आहे.

जवळपास कोणतेही हॉस्पिटल नसल्याने अपघात, सर्पदंश अथवा हृदय विकारा सारखा त्रास झाल्यास नागरीकांना उपचार वेळेत मिळत नाही. त्यामुळे नागरीकांना जीव गमवावा लागतो.

Pimpri : वाहतूक पोलिसांकडून “एक दिवस शाळेसाठी” उपक्रमांतर्गत 3 हजार 660 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

तळवडे येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जागा उपलब्ध आहे. याठिकाणी बहुतेक आय. टी. कंपन्या असल्याने या परिसरात कंपन्यांपासुन कोणतेही ध्वनी व वायू प्रदुषण होत नाही. त्यामुळे तळवडे येथे हॉस्पिटल उभारण्यास MIDC च्या A-34 या 17940 चौ.मी या भूखंडावर बांधलेली 10510 चौ.मी चटई क्षेत्राची इमारत विनावापर शिल्लक आहे. ती इमारत सुस्थितित असुन त्यामध्ये कायदेशीर बदल करून सदरची इमारतीमध्ये हॉस्पिटल सुरु करावे यासाठी अजित गव्हाणे व पंकज भालेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

हॉस्पिटलकरीता इमारत बांधण्यास मनपास कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. ही बाब उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. यावरती एमआयडीसी अधिकारी व महापालिका आयुक्त यांना संयुक्त बैठक घेत एमआयडीसीची जागा हॉस्पिटल साठी देण्याबाबत अजितदादांनी तातडीने निर्देश दिले. त्यामुळे तळवडे, रुपीनगर, ज्योतीबानगर, त्रिवेणीनगर, गणेशनगर, ताम्हाणे वस्ती, सहयोगनगर, चिखली भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होण्याकरिता एमआयडीसीच्या जागेत हॉस्पिटल होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.