Chinchwad: “कामगारांमधून उद्योजक निर्माण व्हावेत!” – पुरुषोत्तम सदाफुले

एमपीसी न्यूज – “घट्टे पडलेले हात पवित्र असतात. असे हात (Chinchwad)असलेल्या कामगारांमधून उद्योजक निर्माण व्हावेत!” अशी अपेक्षा महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी  व्यक्त केली.

चिंचवड येथे शुक्रवारी (दि.9) इंडस्ट्री सपोर्ट ऑर्गनायझेशन तर्फे (Chinchwad)आयोजीत ‘शासनाच्या विविध योजना आता लघु व मध्यम उद्योजकाच्या दारी’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी पुणे जिल्हा उद्योग केंद्राच्या उद्योग निरीक्षक शैला वानखेडे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ – संभाजीनगर केंद्रप्रमुख संदीप गावडे, तुकारामनगर केंद्रप्रमुख प्रदीप बोरसे, इंडस्ट्री सपोर्ट ऑर्गनायझेशनचे संचालक नंदकिशोर जगदाळे आणि सूर्यकांत मुळे आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थित होते..
मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी गुणवंत कामगार सुरेश कंक यांनी,

“तुकोबाच्या सोयऱ्यात

विठू सावळा पहावा

रामकृष्ण म्हणोनिया

एक वृक्ष तो लावावा!”

या कवितेचे गायन केले. कार्यक्रमाच्या दरम्यान गुणवंत कामगार अण्णा जोगदंड यांचा विशेष सन्मान करण्यात आला. इंडस्ट्री सपोर्ट ऑर्गनायझेशनच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश कंक यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.