Alandi: जलप्रदूषणामुळे इंद्रायणी नदीला हिमनदीचे स्वरूप

इंद्रायणी नदी काठच्या गावातील  मैला मिश्रित (Alandi)सांडपाणी तसेच कारखान्यातील केमिकल युक्त सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट ते सांडपाणी इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. यामुळे इंद्रायणी नदी वारंवार फेसाळलेली दिसून येत आहे.

आज दि.10 रोजी सुद्धा दुसऱ्या दिवशी आळंदी येथील सिध्दबेट जवळील बंधाऱ्या खालील नदीपात्र मोठ्या प्रमाणात फेसाळलेले दिसून आले.इंद्रायणी नदीपात्रातील पाण्यावर मोठ्या प्रमाणात पांढरा शुभ्र  फेस तरंगत होता.

Talewade : रेडझोन हद्दीतील एमआयडीसीच्या इमारतीत होणार हॉस्पिटल;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

जणू इंद्रायणी नदीने हिम नदीचे रूप धारण केल्या सारखे भासत होते एका बाजूला जलप्रदूषणा मुळे इंद्रायणी मोठ्या प्रमाणात दिसून येत होती.तर दुसरीकडे इंद्रायणी घाटावर गीता भक्ती अमृत महोत्सवा निमित्त सुशोभीकरण चालू आहे.

या झालेल्या  जलप्रदूषण नदीपात्रात भाविक स्नान करताना दिसून येत होते.वारंवार होत असलेल्या या जलप्रदूषणा मुळे स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.