Alandi: पदमावती रस्त्यावर डंपरच्या खाली एका महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज-आळंदी येथे दि.10 रोजी पद्मावती रस्त्यावर ओम गुरुदेव मंगल कार्यालय(Alandi) जवळ डंपर व दुचाकीचा अपघात झाला.त्या अपघातात डंपरचे चाक त्या महिलेच्या डोक्यावरून गेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला आहे.अधिक याबाबत तपास आळंदी पोलीस स्टेशन करत आहे.
 त्या महिलेचे नाव प्रीती योगेश धुमाळ अंदाजे वय वर्ष (30–32)असून वाय सी एम रुग्णालयात शवविच्छेदना करता नेण्यात आले आहे.याबाबत माहिती ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांनी दिली.

 तसेच त्या महिला इंद्रायणी हॉस्पिटल चाकण रोड येथे कर्मचारी म्हणून काम (Alandi)करत होत्या. त्यांचे पती सुद्धा एके ठिकाणी कामास आहे.व त्यांना लहान 2 लहान मुले आहेत. याबाबत माहिती विठ्ठल शिंदे व  पद्मावती माता नगर येथील माता भगिनी दिली.तर त्यांच्या सोबत चिमुकला होता.तो बचावला असल्याची माहिती अर्जुन मेदनकर यांनी दिली.
 या झालेल्या अपघाता मुळे आळंदी शहरातून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे.
आळंदी शहरात सकाळी 7 ते रात्री 10 यावेळेत  जडवाहनास प्रवेश बंदी आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.