Chinchwad : विनापरवाना रस्ते खोदणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – वाहतूक विभागाची परवानगी न घेता रस्त्यावर खोदकाम (Chinchwad)केल्यास संबंधितांवर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत. असा इशारा पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाने दिला आहे. त्याबाबत एका कंत्राटदारावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात चाकण, भोसरी, तळेगाव हि औद्योगिक क्षेत्रे तसेच हिंजवडी, तळवडे, चिखली ही आयटी पार्क क्षेत्रे आहेत. तसेच देहू आणि आळंदी ही तिर्थक्षेत्र आहेत. त्यामुळे शहरात सातत्याने अती महत्वाच्या व्यक्तींसह देश विदेशातील नागरिकांचा राबता असतो.

 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये सार्वजनिक रस्त्यावर(Chinchwad) चालणाऱ्या तसेच चालू करण्यात येणाऱ्या खोदकामास पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेकडील ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असल्याने संबंधीत ठेकेदारांना हे खोदकाम करण्याच्या आगोदर वाहतूक शाखेची परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर त्यांना वाहतूक शाखेकडून योग्य त्या अटी व शर्ती घालून ना-हरकतपत्र देण्यात येत असते.

Pune: पुणे लोकसभा निवडणूक शरद पवार यांनी लढवावी, कार्यकर्त्यांची मागणी

शहरातील काही ठेकेदार वाहतूक विभागाची परवानगी न घेता काम करत असल्याचे वाहतूक विभागाच्या निदर्शनास आले आहे. अती महत्वाच्या व्यक्तींच्या दौरा मार्गावर असे अनधिकृत खोदकाम केल्यास अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा विना परवाना खोदकाम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

Pune: पुणे लोकसभा निवडणूक शरद पवार यांनी लढवावी, कार्यकर्त्यांची मागणी

देहूरोड वाहतूक विभागात मुकाई चौक ते किवळे गाव जाणारे रोडवर खोदकाम करणारे मे लिपारु इन्फ्रा लि या कंपनीचे काम सुरू असून हे काम विना परवाना सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. त्यावरून कंपनीचे संबंधित अधिकारी फारूक खान (रा. साईनाथ नगर, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतूक विभागाची परवानगी न घेता सार्वजनिक रस्त्यावर वाहनांना अडथळा होइल अशा प्रकारे खोदकाम केले म्हणून भारतीय दंड विधान कलम 283, 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.