Pune: पुणे लोकसभा निवडणूक शरद पवार यांनी लढवावी, कार्यकर्त्यांची मागणी

एमपीसी न्यूज – पुण्यातील लोकसभा जागेसाठी भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Pune)यांना उमेदवारीही जाहीर केली. त्यांनी निवडणुकीचा प्राचारही सुरू केला आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण राहणार, याबाबत अनेक नावे समोर येत आहेत.
महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. येथून मीच निवडणुकीच्या रिंगणात  (Pune)उतरावे, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केल्याची माहिती खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
  पुणे, माढा, साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. पण आतापर्यंत मी 14 निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या आहेत. मात्र आता निवडणूक लढविणार नसल्याचे या आधीच जाहीर केलेले आहे.

शरद पवार हे मंगळवारी मोदीबाग येथील निवासस्थानी होते. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांना भेटले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबतही चर्चा झालेली आहे. ठाकरे गटाच्या प्रवक्ता व उपनेत्या सुषमा अंधारे, शिवसंग्राम पक्षाच्या प्रमुख ज्योती मेटे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे.

NCP :  विजय शिवतारे यांनी अजित पवार यांची माफी मागावी, अन्यथा.. राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

 

बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पंकजा मुंडे या लढणार आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवाराचा शोध सुरू आहे. त्या ठिकाणहून अनेक इच्छूक आहेत. त्यात शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या व स्वर्गीय विनायक मेटे यांची पत्नी ज्योती मेटे या ठिकाणहून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांनी आज पुण्यात शरद पवार यांची भेट घेऊन निवडणूक लढविण्याबाबत इच्छा व्यक्त केली आहे.
परंतु शरद पवारांनी यावर अद्याप निर्णय दिलेला नाही. तसेच मागच्या वेळी प्रितम मुंडेविरुद्ध मैदानात उतरलेले बजरंग सोनवणे हे पुन्हा एकदा लढण्याची तयारी करत आहेत. ते सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर आहे. परंतु ते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा बोलले जात आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.