PCMC : कार्यरत अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीआधीच इतरांना पदोन्नती!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील  विद्यमान (PCMC) कार्यरत कार्यकारी अभियंत्यांना सहा ते आठ महिने सेवानिवृत्ती कालावधी असताना 7 उपअभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे पदोन्नतीसाठी एवढी लगीनघाई का?असा सवाल उपस्थित होत आहे.

महापालिकेतील विविध विभागांतील 13 उपअभियंत्यांना सेवाज्येष्ठता, शैक्षणिक अर्हता तपासून (PCMC)कार्यकारी अभियंता (स्थापत्य) पदावर पदोन्नती देण्यात येणार आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीला आणखी सहा ते आठ महिने शिल्लक आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीची वाट न पाहता आधीच सर्वसाधारण सभेत पदोन्नती देण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे पदोन्नती मिळूनही 7 उपअभियंत्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीची वाट पाहावी लागणार आहे.

शहर अभियंता पदावरील दोन वरिष्ठ अधिकारी चार ते पाच महिन्यांत सेवानिवृत्त झाल्यावर अजय सूर्यवंशी आणि सुनील भागवानी यांना त्या पदावर पदोन्नती देण्यात येणार आहे. त्या दोघांनाही सह शहर अभियंता पदावर पदोन्नती देण्यास महासभा सर्वसाधारण सभेची आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.

हे अधिकारी होणार सेवानिवृत्त
महापालिकेतील कार्यकारी अभियंता पदावरून राजेंद्र राणे, रामनाथ टकले, विलास देसले, आबासाहेब ढवळे, ज्ञानदेव जुंधारे, संजय तुपसाखरे हे अधिकारी सेवानिवृत्त होणार आहेत.

 

Pune: जो कोणी उमेदवार पक्ष देईल, त्याला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडुन आणून महाविकास आघाडीचे हात बळकट करायचे, काँग्रेसच्या बैठकीत निर्धार

यांना मिळणार पदोन्नती

उपअभियंता पदावर असलेले  वैशाली ननावरे, राजेंद्र मोराणकर, विजय वार्डकर, हरविंदरसिंह बन्सल, सतीश वाघमारे, विजय जाधव, विजय सोनवणे, विजय भोसले, लक्ष्मीकांत कोल्हे, विजय भोजने, सुनील नरोटे, महेश बरीदे आणि देवेंद्र बोरावके या अधिकाऱ्यांना कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती मिळणार आहे.

महापालिकेच्या आस्थापनेवर कार्यकारी अभियंत्यांची (स्थापत्य) 24 पदे शासन मंजूर आहेत. महापालिका सेवा प्रवेश व वर्गीकरण नियम 2020 नुसार कार्यकारी अभियंत्यांना (स्थापत्य) पदोन्नती देण्यात येत आहे. या पदासाठी शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवा ज्येष्ठता, गोपनीय अहवाल, शिस्तभंग, मालमत्ता व दायित्वाची माहिती, संगणक अर्हता आदी सेवाविषयक तपशील पडताळून घेण्यात आले असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त  विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.