Hadapsar : चेष्टा मस्करी बेतली जीवावर; अल्पवयीन तरुणाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : चेष्टा मस्करी एका अल्पवयीन मुलाच्या जीवावर (Hadapsar) बेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चेष्टेत कॉम्प्रेसरचा पाईप गुरुद्वाराला लावला आणि त्यानंतर पोटात हवा जाऊन या तरुणाचा मृत्यू झाला. हा प्रकार हडपसर परिसरातील इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये सोमवारी सकाळच्या सुमारास घडला. पुना फ्लोअर अँड फुड कंपनीत ही घटना घडली.

मोतीलाल साहु (वय 16) असे मृत्यु पावलेल्या युवकाचे नाव आहे. हडपसर पोलिसांनी धिरजसिंग गोपालसिंग गौड (वय 21) याला अटक केली आहे. याबाबत शंकरदिन रामदिन साहु (वय 34) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत मोतीलाल साहू हा पुना फ्लोअर अ‍ॅड फुडस या कंपनीत कामाला होता. कंपनी परिसरातच त्याच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तर आरोपी देखील त्याच परिसरात राहत होता.

दरम्यान या कंपनीत मैदा तयार करण्याचे काम सुरू असताना आरोपीने चेष्टा मस्करीत कॉम्प्रेसरचा पाईप मोतीलाल साहू यांच्या गुदद्वाराला लावला.

त्यानंतर प्रचंड वेगाने हवा मोतीलाल साहू याच्या पोटात गेली. या (Hadapsar) घटनेने तो जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटकही केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

Lonavala : लोणावळा शहरातील मॅगी पॉइंटवर होणार कारवाई; गुन्हेगारीच्या घटना वाढल्याने पोलिसांचे पाऊल

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.