Chinchwad : किल्ले बनवा स्पर्धेतील 460 स्पर्धकांची छत्रपती शिवरायांना किल्ल्यांची मानवंदना

एमपीसी न्यूज –  सेवा सारथी फाउंडेशन व पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Chinchwad)आयोजित दीपावली निमित्त शाहूनगर, पूर्णा नगर, संभाजीनगर, शिवतेज नगर, कृष्णानगर, अजमेरा, आकुर्डी या परिसरात किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे 7 वे वर्ष होते. रविवारी सायंकाळी या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेचे बक्षीस वितरण  अमित गोरखे यांच्या हस्ते करण्यात आले.

पूर्णा नगर येथील सेवा सारथी फाऊंडेशनचे अध्यक्ष ओंकार मांडगे यांनी दीपावली निमित्त किल्ले स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत 435 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रथम 5 क्रमांक काढण्यात आले होते. तसेच उत्तेजनार्थ 5 बक्षिसे देण्यात आली.

यावेळी अक्षय चंडेल,आशिष चिकने,बिनिष सुरेंद्र,किरण (Chinchwad) लवाटे,किरणराज यादव,एकनाथ पवार,अमित गोरखे,गंगाधर मांडगे,उमेश कुटे,तुषार हिंगे,निलेश नेवाळे,योगिता नागरगोजे,केशव घोळवे,सुप्रिया चांदगुडे,सचिन सानप,प्रवीण कोठावदे,अनुराधा गोरखे,सचिन ढोबळे,भीमा बोबडे,कैलास दुर्गे , अरुण पाडुळे, निशांत बोरसे,पन्नालालजी जाधव,अजय पाताडे,गोरख पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

Hadapsar : चेष्टा मस्करी बेतली जीवावर; अल्पवयीन तरुणाचा जागीच मृत्यू

स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे :

प्रथम क्रमांक – सुरश्री हाउसिंग सोसायटी, संभाजीनगर, द्वितीय क्रमांक – नंदादीप सोसायटी, शिवतेजनगर,तृतीय क्रमांक – संत ज्ञानेश्वर विरंगुळा केंद्र, अजमेरा, चतुर्थ क्रमांक – सी-21, स्वामी समर्थ बिल्डींग, घरकुल, पंचम क्रमांक – आम्ही गड गोंधळी, पूर्णा नगर, उत्कृष्ट सजावट आणि स्वच्छता –अजिंक्यतारा सोसायटी, गुरुदत्त मंदिर,उत्कृष्ट सादरीकरण – वक्रतुंड मित्र मंडळ, पिंपळे सौदागर, उत्कृष्ट सादरीकरण – श्री निवास सोसायटी, शाहू नगर,उत्कृष्ट सामाजिक संदेश – तुलसी संकुल सोसायटी, पूर्णानगर,उत्कृष्ट सामाजिक संदेश – शुभंकरोति हाउसिंग सोसायटी, पूर्णानगर.अशा पाच उत्कृष्ट किल्ला बनविलेल्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

अमित गोरखे यांनी स्पर्धकांना सांगितले की किल्ले बनवण्याआधी अथवा साकारत असताना किल्ल्यांची माहिती घेणे. सर्व ऐतिहासिक गड, किल्ले याबद्दल वाचन, अभ्यास करणे. यामुळे मुलांना इतिहासाची उजळणी व त्यांच्या ज्ञानात इतिहासा विषयी जागृती होण्यास मदत होईल.

सेवा सारथी फाउंडेशनचे अध्यक्ष ओंकार मांडगे म्हणाले की, आमची संस्था दरवर्षी हा उपक्रम राबवत आहे. हा उपक्रम राबविण्याचा खरा उद्देश म्हणजे सदनिका, इमारती, सोसायटी यामध्ये ही पारंपरिक संस्कृती लुप्त होऊ लागलेली आहे.

यासाठी दिवाळीमध्ये किल्ले बनविण्याची लहान लहान मुले, तरुण वर्ग, मंडळ यांच्यात आवड निर्माण व्हावी व त्यामागचा महाराजांचा इतिहास कळावा हाच त्यामागचा माझा खरा उद्देश आहे.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शुभम खनका,योगेश पाठक, आर्यन महाजन, ईशान मोटे, ओम काळे, अर्णव दीक्षित, कार्तिक चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.