Talegaon Dabhade : विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्व स्तरावरील प्रयत्न आवश्यक – संतोष खांडगे

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्व स्तरावरून (Talegaon Dabhade)प्रयत्न होणे गरजेचे आहे. शैक्षणिक संस्था, शिक्षक, पालक यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी केले.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने 2 डिसेंबर रोजी झालेल्या स्पर्धा परीक्षा शिक्षक मार्गदर्शन कार्यशाळेच्या समारोप समारंभात संतोष खांडगे हे अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी संस्थेचे संचालक सोनबा गोपाळे गुरूजी, मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, संजय वंजारे, वासंती काळोखे, सविता चव्हाण, व्याख्यात्या मनिषा गाडे आदी उपस्थित होते.

Chinchwad : किल्ले बनवा स्पर्धेतील 460 स्पर्धकांची छत्रपती शिवरायांना किल्ल्यांची मानवंदना

कार्यशाळेचे उदघाटन प्रगती विद्या मंदिराचे शालेय समितीचे अध्यक्ष दामोदर शिंदे, महेश शहा, सोनबा गोपाळे गुरूजी, विनायक अभ्यंकर, भाऊसाहेब आगळमे, पांडुरंग पोटे यांनी केले.

संस्थेच्या सर्व (Talegaon Dabhade) शाळामधील शिक्षकांकरिता राज्य व केंद्र शासन शिष्यवृती परीक्षेच्या विद्यार्थाना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांकरीता ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेतील शिक्षकांना उमेश इंगुळकर, श्रीकांत दळवी, मनिषा गाडे यांनी मार्गदर्शन केले.

विद्यार्थी सर्वगुण संपन्न होण्याबरोबरच त्यांची गुणवत्ता ही वाढली पाहिजे असे  खांडगे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनबा गोपाळे गुरूजी यांनी केले. आभार पांडुरंग पोटे यांनी मानले. दुर्गा भेगडे यांनी सूत्रसंचालन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.