Talegaon Dabhade : नवीन समर्थ विद्यालयाच्या नूतन वास्तुचे बुधवारी भूमिपूजन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ (Talegaon Dabhade) संचलित नवीन समर्थ विद्यालय या ऐतिहासिक शाळेच्या नूतन वास्तुचा भूमिपूजन समारंभ बुधवारी (दि. 6) सकाळी 10.30 वाजता मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूलजवळ होणार आहे, अशी माहिती नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी दिली.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार कृष्णराव भेगडे समारंभाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि सारिका भेगडे यांच्या हस्ते हे भूमिपूजन संपन्न होणार आहे.

Pimpri : डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलामुळे नागरिकांची वाहतुकीची समस्या होणार दूर

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, खजिनदार राजेश म्हस्के, सहसचिव नंदकुमार शेलार, नवीन समर्थ विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष महेशभाई शहा, नवीन समर्थ विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या प्राचार्या वासंती (Talegaon Dabhade) काळोखे, पर्यवेक्षक रेवाप्पा शितोळे उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.