Sangvi : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण; तुकाराम सुपे यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – टीईटी परीक्षा घोटाळ्यातील तत्कालीन (Sangvi) शिक्षणाधिकारी (माध्यमिक जिल्हा परिषद पुणे) तुकाराम नामदेव सुपे (वय 59, रा. पिंपळे गुरव) विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन 1986 ते 25 डिसेंबर 2021 या कालावधीत सुपे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचे परीक्षण करून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. 6 डिसेंबर) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लोकसेवक (Sangvi) तुकाराम सुपे यांच्या विरोधात पुणे शहर सायबर पोलीस ठाण्यात सन 2021 मध्ये टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासात प्जोलीसनी दोन कोटी 87 लाख 99 हजार 590 रुपये रोख रक्कम आणि 72 लाख रुपये किमतीचे 145 तोळे सोने असा एकूण तीन कोटी 59 लाख 99 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Talegaon Dabhade : विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्व स्तरावरील प्रयत्न आवश्यक – संतोष खांडगे

हा गुन्हा दाखल झाला त्यावेळी तुकाराम सुपे हे राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी धारण केलेली कोट्यावधी रुपयांची संपत्ती भ्रष्ट मार्गाने कमावली होती. त्यांच्या नोकरीच्या कालावधीतील वैध उत्पन्नापेक्षा अधिक रक्कम असल्याने त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.