Talegaon Dabhade : ॲड्. पु. वा.परांजपे विद्या मंदिरात शिक्षक प्रशिक्षण शिबीर संपन्न

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील ॲड्. पु. वा. परांजपे विद्या मंदिर या (Talegaon Dabhade ) शाळेत शिक्षक प्रशिक्षण शिबीर गुरुवारी (दि. 21) संपन्न झाले. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित ॲड्. पु. वा. परांजपे विद्या मंदिर (नूतन विद्या मंदिर) अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मावळ नागरी सहकारी पतसंस्था तळेगाव स्टेशन व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षकांनी प्रगल्भ असणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या शिबिरासाठी संगम पॉवर संस्थेचे संस्थापक व मार्गदर्शक श्रीनारायण चांडक (U.S.A.),नू.म.वि.प्र. मंडळाचे उपक्रमशील सचिव,मावळ नागरी सहकारी पतसंस्था व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, महेशभाई शहा,डॉ.शाळीग्राम भंडारी, रुपेश पागे,गिरीधर राठी,सुधीर अलकरी,प्रकल्प प्रमुख रो.मिलिंद शेलार,प्रकल्प प्रमुख रो.लक्ष्मण मखर, रो.विल्सेट सालेर,रो.सुनील खोल्लम, शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, भाऊसाहेब आगळमे,भाऊसाहेब वंजारे,वासंती काळोखे,कैलास पारधी,श्रीम.अनिता लादे तसेच सर्व शाळांमधील शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, प्रतिमापूजन व ईशस्तवनाने झाली. शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे सर यांनी प्रास्ताविकात बदलत्या शैक्षणिक धोरणात शिक्षक प्रशिक्षणाची गरज व्यक्त केली.

Pimpri : हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र सलग दुसर्‍यांदा फायनलमध्ये!

डॉ.शाळीग्राम भंडारी यांनी आपल्या मनोगतात शिक्षक कसा असावा आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत आपले ज्ञान (Talegaon Dabhade) कशाप्रकारे पोहोचवावेत याचे मार्गदर्शन केले.

शिबिराचे मार्गदर्शक श्रीनारायण चांडक यांनी संगम पॉवर संस्थेच्या वतीने कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञान- कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये कसे रुजवावे याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी 24 प्रकारचे मार्गदर्शक व्हिडिओ तयार केले असून त्याचे निशुल्क मार्गदर्शन सहा प्रांतात 70 हजार विद्यार्थ्यांना केलेले आहेत.

श्री.रुपेश पागे यांनी G-5, G -life, आणि S-16 या कौशल्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या आधारे विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास कसा करावा याचे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

संतोष खांडगे यांनी आपला मनोगतात विद्यार्थ्यांना शालेय ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञान आवश्यक आहे तसेच विद्यार्थ्यांसाठी कौशल्यांवर आधारित मार्गदर्शनाची गरज ओळखून संस्था दरवर्षी शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करते असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा काळडोके यांनी केले तर आभार शाळेच्या पर्यवेक्षिका कमल ढमढेरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

https://www.youtube.com/watch?v=YN470gAkDJA&t=39s

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.