Thergaon : खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विद्यालय थेरगाव (Thergaon) येथील राष्ट्रीय कबड्डी खेळाडू विद्यार्थिनींचा मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खेळाडूंसह गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील गौरव खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आला.

सत्कार समारंभासाठी उपायुक्त मनोज लोणकर, महादेव करगावडे, अभिषेक बारणे, संतोष बारणे, तानाजी बारणे, बाळासाहेब वाघमोडे, बाळासाहेब राठोड, दत्ता झिंजूर्डे, अनिता केदारी, प्रशिक्षक बन्सी आटवे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत सहा वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेणारी मनीषा रामराव राठोड, महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत चार वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेणारी भूमिका कमलेश गोरे, महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत तीन वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतलेली प्रतीक्षा कालिदास लांडगे, राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेत रौप्य पदक विजेती रेखा रामराव राठोड, महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत दोन वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी घेणारी श्रावणी विकास सावंत, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू रुपाली त्र्यंबक डोंगरे या खेळाडू विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत मुलींना शिकवण्याचे काम या खेळाडू विद्यार्थिनींचे पालक करीत आहेत. महापालिकेच्या शाळेत शिकून अशा प्रकारे चमकदार कामगिरी या खेळाडूंनी केली आहे. पिंपरी-चिंचवड माध्यमिक विद्यालय थेरगाव या शाळेतून महापालिकेच्या एक लाख रुपये बक्षिसाचे मानकरी ठरलेले दहावीचे गुणवंत विद्यार्थी प्रतीक्षा परशुराम कांबळे (92.20 टक्के), सिद्धी नारायण पवार (90.40 टक्के), आदित्य चंद्रकांत कांबळे (90.20 टक्के) यांचा देखील खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “मी नगरसेवक असताना महापालिकेच्या माध्यमातून थेरगाव (Thergaon) येथे माध्यमिक विद्यालयाच्या प्रशस्त व देखण्या इमारतीची उभारणी केली. त्याच शाळेतील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करीत आहेत. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी हे सर्वसामान्य कुटूंबातील आहेत. परिस्थितीवर मात करून त्यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकीकात भर घातला आहे. अशा विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा सर्व खर्च महापालिका प्रशासनाने उचलावा व पुढे त्यांना नोकरीत प्राधान्य द्यावे.

खासदार बारणे यांच्या प्रयत्नातून उभी राहिलेल्या महापालिकेच्या दिलीप वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमीची आठवण करून देत ऋतूराज गायगवाड सारखा क्रिकेटर आज देशासाठी खेळतो आहे. 2007 साली दूरदृष्टीने उभारलेल्या प्रकल्पाचे फलित असल्याचे खासदार बारणे म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.