PCMC : उपायुक्त सुभाष इंगळे यांच्याकडे आकाश चिन्ह विभाग

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) कामगार कल्याण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांच्याकडे आकाश चिन्ह व परवाना विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सोमवारी (दि.19) जारी केला आहे.

कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांच्याकडे आकाश चिन्ह व परवाना विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. मात्र, कर संकलन हा विभाग पालिकेच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने महत्वाचा विभाग आहे.

त्यामुळे देशमुख यांनी या विभागावरच लक्ष केंद्रीत करावे, यासाठी (PCMC) त्यांच्याकडील आकाश चिन्ह विभागाचा भार हलका केला आहे. इंगळे यांच्याकडे कामगार कल्याण बरोबरच आकाश चिन्ह व परवाना विभागाची जबाबदारी असणार आहे.

Thergaon : खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.