Pimpri News : पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना जुलै पासून लागू होणार सातवा वेतन आयोग

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल‌च्या कामगारांना सातवा वेतन आयोग (Pimpri News) लागू करावा याबाबत पीएमपी कर्मचारी व कर्मचारी संघटनेकडुन सातत्याने मागणी होत होती. पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांच “सातवा वेतन तातडीने आयोग लागू करण्यात यावा” याबाबत राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्याकडे भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केलेली होती.

PCMC : उपायुक्त सुभाष इंगळे यांच्याकडे आकाश चिन्ह विभाग

त्यानुसार ई- बस डेपो उद्घाटनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीएमपी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करणेबाबत पीएमपीचे अध्यक्ष व दोन्ही महापालिका आयुक्त यांच्या समवेत बैठक घेऊन सातवा वेतन आयोगचा विषय तातडीने मार्गी लावावा अश्या सुचना पीएमपी प्रशासनाला दिलेल्या होत्या‌.

 

पीएमपीएमएलचे तत्कालीन अध्यक्ष बकोरिया साहेब यांनी माहे डिसेंबर २०२२ पासुन ५०% वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला व उर्वरित ५०% वेतन आयोग पीएमआरडीए,महाालिकेकडुन संचलन तुट उपलब्ध झाल्यानंतर देण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला होता.

 

मागील महिन्यात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पीएआरडीएच्या बैठकीत पीएमपीएमएल एक रक्कमी संचलन तुट देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ५० कोटी रु. जुन महिन्यात प्राप्त झाले होते.तेव्हापासुन सर्व संघटनांनी एकमताने उर्वरित ५० % वेतन आयोग लागू करण्याची मागणी पीएमपीएमएल प्रशासनाकडे लावुन धरली होती.तसेच याबाबत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत(दादा)पाटिल यांच्याकडे सातत्याने मागणी करत होते.

 

त्यानुसार पीएमपीएमएलच्या मुख्य कार्यालयात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी संचालक मंडळाची बैठक पार पडली यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी १००% सातवा वेतन‌ आयोग जुलै महिन्यापासून लागु करण्याचे आदेश पीएमपीएमएलच्या अध्यक्ष यांना देऊन सदरच्या प्रस्तावास मान्यता दिली व उर्वरित मागण्यांबाबत देखील मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या समवेत लवकरच बैठक घेऊन तातडीने मार्गी लागतील असे सर्व कामगार संघटनाना आश्वस्त केले आहे.

तसेच याबाबतचे यावेळी इंटक संघटनेचे राजेंद्र खराडे, पीएमपीएमएल राष्ट्रवादी कामगार संघटनेचे सुनिल नलावडे,कर्मचारी महासंघाचे बबन झिंझुर्डे, श्रमिक ब्रिगेडचे नाना सोनवणे यांच्या सह इतरही संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते .

 

 Thergaon : खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.