Ghoravadeshwar : महाशिवरात्रीनिमित्त निगडीमधून घोरावडेश्वरला बस

एमपीसी न्यूज – महाशिवरात्रीनिमित्त पीएमपीएमएल प्रशासनाकडून ( Ghoravadeshwar ) निगडी येथून घोरावडेश्वर येथे जाण्यासाठी विशेष बस सोडल्या जाणार आहेत. दर 10 ते 15 मिनिटांनी ही बस सोडली जाणार आहे.

निगडी येथून वडगाव, नवलाख उंबरे, लोणावळा, कामशेत येथे बस सोडल्या जातात. याच मार्गावर घोरावडेश्वर हे देवस्थान आहे. महाशिवरात्रीनिमित्त येथे हजारो भाविक भक्त जात असतात. शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असल्याने इथे भाविकांना जाता यावे यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाकडून सोय करण्यात आली आहे.

Pune : तीन कोल्हे आणि एका तरसाच्या बदल्यात पुण्याची भक्ती वाघीण पाठवली जयपूरला

मधुकरराव पवळे उड्डाणपूल निगडी येथून घोरावडेश्वर मंदिर पायथा शंकरवाडी पर्यंत विशेष बससेवा असणार आहे. या मार्गावरील पहिली फेरी पाहते 5.20 वाजता निगडी येथून सुटेल. पर्यायी बस क्रमांक 305, 341, 342, 368, 371 या पाच मार्गांवर सरासरी दहा ते 15 मिनिटांनी बस सोडली जाणार आहे. त्यामुळे वरील क्रमांकाच्या बस मधून निगडी येथून भाविकांना घोरावडेश्वर येथे जाता ( Ghoravadeshwar ) येईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.