Nigdi : महिला वाहतूक पोलिसांचा मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालय, निगडीच्यावतीने सन्मान

एमपीसी न्यूज – मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालय, निगडीच्यावतीने ( Nigdi ) शुक्रवारी (दि.8) जागतिक महिला दिन चिंचवडगाव येथील वाहतूक पोलीस ठाणे मधील महिला वाहतूक पोलिसांचा गुलाबपुष्प भेटवस्तू, श्रीफळ आणि मिठाई देऊन मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयिका सुजाता बलकवडे, वंदना पांडे आणि शिक्षिका यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

त्यावेळी महिला वाहतूक पोलीस नाईक सुप्रिया बोऱ्हाडे व विद्या वाघमारे, हवालदार प्रज्वला बरवडे, अंमलदार सुप्रिया शिंदे, तसेच पोलीस निरीक्षक शंकर डामसे, पीएसआय सुरेश उगले, सहाय्यक पोलीस दत्तात्रय माळवदकर उपस्थित होते.

Pimpri : पिंपरी न्यायालयाचा 35 वा वर्धापनदिन आणि जागतिक महिलादिन सन्मान सोहळा संपन्न

आपले कर्तव्य व कौटुंबिक जबाबदाऱ्या या दोन्हीं जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळतात. याबद्दल त्यांचे कौतुक केले. सर्व महिला वाहतूक पोलीस देखील त्यांचा सन्मान केल्यामुळे भारावून गेल्या आणि आपल्या कार्याचा गौरव केल्यामुळे काम करण्यास आणखी बळ मिळाले. अशी भावना व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालयाच्या अध्यक्ष ज्योत्स्ना एकबोटे, प्रमुख्याध्यापक योगेश ठिपसे, प्राचार्या शारदा साबळे, समन्वयिका सुजाता बलकवडे आणि वंदना पांडे यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना धुमाळ यांनी केले. आभार अमृता कुलकर्णी यांनी ( Nigdi ) मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.