X Mail : G Mail ला येणार पर्याय; एलन मस्क आणणार X Mail

एमपीसी न्यूज – जगभर लोकप्रिय असलेल्या गुगलच्या G Mail ला एलन मस्क पर्याय ( X Mail) आणण्याच्या तयारीत आहेत. एलन मस्क X Mail ही सेवा आणणार आहेत. यामुळे एलन मस्क यांनी थेट गुगलला टक्कर देण्याची तयारी केल्याचे दिसते.

कार्यालयीन कामकाजासाठी आजही G Mail ला प्राधान्य दिले जाते. त्यावरील संभाषण अधिकृत समजले जाते. जगभरात G Mail चे 180 कोटी युजर्स आहेत. G Mail जगभरात लोकप्रिय आहे.

Ghoravadeshwar : महाशिवरात्रीनिमित्त निगडीमधून घोरावडेश्वरला बस

पण आता याला एलन मस्क पर्याय आणणार आहेत. ते X Mail ही सेवा लॉँच करण्याची तयारी करीत आहेत. X Mail मध्ये वापरकर्त्यांना कोणती सुविधा मिळेल, त्याची रचना कशी असेल, याबाबत अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

सोशल मिडीयावर एकाने एलन मस्क यांना X Mail कधी येणार, असा प्रश्न विचारला ( X Mail)  होता. त्यावर एलन मस्क यांनी ‘Its Coming’ असे उत्तर दिले होते.

 

https://www.youtube.com/watch?v=xuetkF0jsmg

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.