Google : गुगल झाले 25 वर्षाचे…आज गुगलचा 25 वा वाढदिवस

एमपीसी न्यूज –  सध्या इंरनेटमुळे जग तुमच्या हातावर आले आहे. जगातल (Google) काहीही शोधायच झालं तर आपण सहज म्हणतो गुगल कर..कारण गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. हेच सर्च इंजिन आज म्हणजे 27 सप्टेंबर 2023 रोजी 25 वर्षाचे झाले आहे. त्याचे सेलेबेशन गुगलनेही डुडल द्वारे साजरे केले आहे.

Pune : शरद पवारांची 1 ऑक्टोबरला जुन्नरमध्ये जाहीर सभा

सर्जे ब्रिन आणि लॅरी पेज हे दोघे स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कम्प्युटर सायन्सची पदवी घेत होते. इंटरनेट – म्हणजेच वर्ल्ड वाईड वेब बाबत दोघांचंही व्हिजन सारखंच असल्यामुळे त्यांनी एकत्र एक सर्च इंजिन तयार करण्यास सुरुवात केली.

27 सप्टेंबर 1998 साली गुगल इनकॉर्पोरेटेडची अधिकृत स्थापना करण्यात आली. पेज यांनी सुरुवातीला या कंपनीचं नाव ‘बॅकरब’ असं ठेवलं होतं. मात्र, नंतर ते बदलून ‘गुगल’ करण्यात आलं.

गुगल हा शब्द खरंतर ‘Googol’ या शब्दाचं बदललेलं रुप आहे. एकावर शंभर शून्य दिल्यानंतर जी संख्या तयार होते, तिला गुगोल म्हणतात. यापासूनच गुगलचं नाव देण्यात आले आहे.

असे हे गुगल आज 25 वर्षाचे झाल. जे आपल्या वाढदिवसा देखील न विसरता शुभेच्छा देते. अशा या गुगल ला आपण पण (Google) शुभेच्छा देऊ.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.