Pune : शरद पवारांची 1 ऑक्टोबरला जुन्नरमध्ये जाहीर सभा

दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात सभा घेणं तूर्तास टाळले

एमपीसी न्यूज – शरद पवारांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा ( Pune ) केली आहे.राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर त्यांच्या आंबेगाव तालुक्यात होणाऱ्या सभेकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या .परंतू त्यांची पहिली सभा 1 ऑक्टोबरला जुन्नरमध्ये होणार आहे.

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या ढोल पथकांवर मर्यादा

बिरसा ब्रिगेडच्या वतीने आदिवासी समाजासाठी पवारांची सभा आहे. त्यामुळे दिलीप वळसे पाटलांच्या आंबेगाव मतदारसंघात सभा घेणं शरद पवारांनी तूर्तास टाळलं आहे.

शरद पवार शिरूर विधानसभा मतदारसंघातही सभा घेणार आहेत. या सभेच्या तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहे.  जुन्नरच्या सभेत आमदार अतुल बेनके यांच्यावर शरद पवार काय भाष्य करणार याकडे सर्वांचे ( Pune ) लक्ष आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.