Pune : तीन कोल्हे आणि एका तरसाच्या बदल्यात पुण्याची भक्ती वाघीण पाठवली जयपूरला

एमपीसी न्यूज – तीन कोल्हे आणि एक मादी तरस यांच्या बदल्यात ( Pune ) राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील भक्ती वाघीण जयपूर येथील नाहरगड जैविक उद्यानात पाठवण्यात आली आहे. प्राणी अदलाबदल कार्यक्रमांतर्गत ही प्राण्यांची अदलाबदल करण्यात आली आहे.

नाहरगड जैविक उद्यान जयपूर मध्ये सुरु होत आहे. या उद्यानात टायगर सफारी सुरु होणार आहे. त्या उद्यानात भारतातील विविध भागातून वाघ आणले जाणार आहेत. पुण्याची भक्ती वाघीण ही नाहरगड जैविक उद्यानातील पहिली पाहुणी ठरली आहे.

Khelo India : खेलो इंडिया पदक विजेते खेळाडूही आता सरकारी नोकऱ्यांसाठी पात्र

राजस्थान वन विभागाचे वरिष्ठ वन्यजीव चिकित्सक डॉ. अरविंद माथुर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक भक्ती वाघिणीला घेऊन पुण्याहून जयपूरसाठी रवाना झाले आहे. याबदल्यात राजीव गांधी राष्ट्रीय प्राणी संग्रहालयात तीन कोल्हे आणि एक मादी तरस पाठवण्यात आले आहेत.

भक्ती वाघिणीला नाहरगड उद्यानात नेल्यानंतर 21 दिवस क्वारंटाईन ठेवले जाणार आहे. त्यानंतर तिला वाघांच्या पिंजऱ्यात सोडले जाणार आहे. भक्ती ही टायगर सफरीची प्रमुख आकर्षण असेल. त्यामुळे तिला दर्शनी पिंजऱ्यापासून दूर ठेवले जाणार आहे.

नाहरगड जैविक उद्यानात नागपूर येथून देखील वाघ वाघिणीची जोडी नेली जाणार आहे. मात्र त्यास अद्याप नागपूर प्राणी संग्रहालयाची परवानगी मिळाली नाही. त्यानंतर या जोडीला देखील नाहरगड येथे नेले जाणार आहे. नाहरगड जैविक उद्यान 30 वर्ग हेक्टर जमिनीवर तयार करण्यात आले असून त्यासाठी साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. आठ किलोमीटर लांबीच्या ट्रॅकवरून पर्यटकांना 45 मिनिटे वाघ पाहता ( Pune ) येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.