Ravet : जागेवर अतिक्रमण केल्या प्रकरणी माजी नगरसेवकाच्या मुलासह चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जागेवर अतिक्रमण केल्या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (Ravet) माजी नगरसेवकाच्या मुलासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 17 जून रोजी रावेत येथे घडला.

याप्रकरणी कांतीलाल मोतीलाल कर्नावट (वय 67, रा. चिंचवड) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून महेंद्र जगन्नाथ गरड, अनिकेत मनोज चव्हाण (वय 29, रा. नवी सांगवी), विशाल माणिक गायकवाड (वय 27, रा. डांगे चौक, थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या जागेत जेसीबीच्या सहाय्याने आरोपींनी अतिक्रमण केले. फिर्यादी यांनी याबाबत विचारणा केली असता अतिक्रमण सुरूच ठेवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

Bjp : सेवा, सुशासन व गरीब कल्याणासाठी भाजपाचे महा-जनसंपर्क अभियान – बाळा भेगडे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.