Bjp : सेवा, सुशासन व गरीब कल्याणासाठी भाजपाचे महा-जनसंपर्क अभियान – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज – सेवा, सुशासन व गरीब कल्याणासाठी भाजपाचे महा-जनसंपर्क (Bjp) अभियान असल्याचे मोदी@चे मावळचे बाळा भेगडे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 9 वर्षे पुर्ण झाली आहेत. त्यानिमित्त मोदी सरकारचे निर्णय, विकास कामे व जनहितार्थच्या योजना यांची माहिती जनतेपर्यंत पोहचावी, याकरिता देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये महा-जनसंपर्क अभियान (30 मे ते 30 जून दरम्यान) मोदी@9 चे कार्यक्रम सुरू आहेत.

याच अभियानाच एक भाग असलेले मोदी@9 अंतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड, पिंपरी व मावळ विधानसभेतील केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचे लाभ मिळालेल्या “लाभार्थी मेळावा काळेवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रधान मंत्री आवास योजना, घरकुल योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री जन-धन योजना, प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना, आयुष्मान भारत योजना, आत्मनिर्भर भारत रोजगार योजना, अटल पेंशन योजना यासह विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी 550 लाभार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.

मोदी@9 चे मावळ लोकसभेचे बाळा भेगडे यांनी उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी (Bjp) भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, चिंचवड विधानसभा प्रभारी शंकर जगताप, आण्णासाहेब विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, माजी महापौर उषा ढोरे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, सरचिटणीस ॲड.मोरेश्वर शेडगे, राजु दुर्गे, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा उज्वला गावडे, पिंपरी विधानसभा संयोजक माऊली थोरात, मावळ विधानसभा किरण राक्षे, चिंचवड विधानसभा संयोजक गोपाळ मळेकर, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, सविता खुळे, उषा मुंढे, अश्विनी चिंचवडे, आरती चौंधे, शारदा सोनावणे, निर्मला कुटे, सुरेश भोईर, बाबा त्रिभुवन, भाजपा शहर उपाध्यक्ष शेखर चिंचवडे, बिभीषण चौधरी व संदीप गाडे, थेरगाव काळेवाडी मंडलाध्यक्ष विनोद तापकिर, यासंह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व मावळ लोकसभेतील लाभार्थी उपस्थित होते. अमर साबळे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी लाभार्थ्यांना माहिती दिली.

Nigdi : तात्यासाहेब शेवाळे यांची अमेरिकेत व्याखानासाठी निवड

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.