Nigdi : तात्यासाहेब शेवाळे यांची अमेरिकेत व्याखानासाठी निवड

एमपीसी न्यूज : एलआयसीच्या निगडी शाखेतील (Nigdi) ज्येष्ठ विमा प्रतिनिधी तात्यासाहेब शेवाळे यांची अमेरिकेत न्याशविल येथे होणाऱ्या जागतिक विमा परिषदेत व्याखानासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातून पहिल्यांदाच अशी निवड होत आहे. अमेरिकेत 23 ते 26 जून दरम्यान एमडीआरटी जागतिक परिषद होत आहे.

शेवाळे यांचे व्याख्यान रविवार दिनांक 25 जून रोजी होणार आहे. या परिषदेमध्ये 126 देशातील तीन हजार विमा कंपन्यांचे दहा हजार विमा प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शेवाळे यांचा विमा क्षेत्रातील 33 वर्षाचा अनुभव असून ते आतापर्यंत ते पुणे, पिंपरी चिंचवड विभागातून 21 वेळा या परिषदेसाठी उपस्थित राहिलेले एकमेव विमा प्रतिनिधी आहेत.

त्यांनी विमा क्षेत्रातील सर्वोच्च बहुमान एमडीआरटी एकवीस, व सीओटी नऊ वेळा मिळविला आहे. असा पुरस्कार मिळविणारे ते एकमेव विमा प्रतिनिधी आहेत. यापूर्वी विमा परिषदेसाठी कॅनडा, सिंगापूर, दुबई मलेशिया, हॉंगकॉंग ,टर्की, शांघाय चीन, ऑस्ट्रेलिया देशात ते उपस्थित राहिले आहेत.

त्यांना जागतिक विमा संघटनेचे आजीवन सदस्यत्व मिळाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल (Nigdi) एलआयसीच्या विभाग दोनच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

Mulshi : कुंभेरी येथील भैरवनाथ देवस्थानच्या जमिनीची परस्पर विक्री; गावकऱ्यांची पोलिसात धाव

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.