Alandi : आळंदीतील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात अशोक बनकर यांचा सेवापुर्ती समारंभ उत्साहात

एमपीसी न्यूज – श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील समाजशास्त्र विषयाचे अध्यापक अशोक बनकर हे शेतकरी कुटुंबातील वडील नामदेव व आई हिराबाई यांचे पुत्र. अशोक बनकर हे शांत स्वभावाचे व कार्यशील, प्रामाणिक यांनी आपल्या वय वर्ष 58 मधील 32 वर्ष शिक्षक म्हणून सेवा पूर्ण केली.

Chikhali : एसएनबीपी संस्थेच्या वतीने ‘सुभद्रा’ आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन; वीस शाळांचा सहभाग

आपल्या केलेल्या ज्ञानदानाच्या सेवेतून अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात जगाच्या क्षितिजावर चमकत आहेत. तसेच अशोक बनकर यांनी आपली सेवा करत – करत आपल्या परिवाराची ही जिम्मेदारी उत्तम रित्या पार पाडली. मुलगा साहिल व मुलगी मिताली यास सुसंस्कारित व उच्च शिक्षित बनविले. दोघेही सध्या जॉब करीत आहेत. अशा कार्यशील, कर्तव्यनिष्ठ, आदर्श व्यक्ती त्यांच्या सेवानिवृत्ती समारंभ निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
 याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह. भ. प. गोविंद महाराज जाधव समवेत राजाराम कांचन (संचालक – कृषी उत्पन्न बाजार समिती, हवेली, जि. पुणे), उद्योजक कांतीलाल डाकलिया, बाळासाहेब मुरकुटे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, विश्वस्त प्रकाश काळे, सेवानिवृत्त शिक्षक रामचंद्र चव्हाण, पंडित थोरात, हमीद शेख, सिद्धनाथ चव्हाण, प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अनिता गावडे, सर्व विभागातील शिक्षक – शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरेश वडगांवकर, अजित वडगावकर, डॉ. दिपक पाटील, प्रकाश काळे, दीपक मुंगसे, प्रशांत सोनवणे, विद्यार्थी स्नेहल कुऱ्हाडे यांनी आपल्या मनोगतातून शांत, संयमी, सुस्वभावी, आदर्श मार्गदर्शक, आजातशत्रू असे व्यक्तिमत्व असणाऱ्या सरांविषयीचा आदर व  त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
तसेच प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षक यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच राजाराम कांचन व गोविंद महाराज जाधव यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांचे कार्य जगातील अलौकिक व महान कार्य असल्याचे सांगितले.
सर्व घटकांनी पुढील जीवन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.  सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले व उपस्थितांचे आभार श्रीधर घुंडरे यांनी व्यक्त केले. याबाबत माहिती गुट्टे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.