Mumabi : ‘आर्ची’ च्या मनमोहक अदांवर नेटकरी झाले फिदा

एमपीसी न्यूज ; आर्ची म्हणजे आपली लाडकी रिंकू राजगुरू वेगळी इनिंग सुद्धा गाजवतेय. ती सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. अर्थातच याचं कारण म्हणजे तिने पोस्ट केलेले वेगळ्याच मूडमधले फोटो. रिंकूने पहिल्यांदाच हॉट अंदाजातील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. त्यामुळे साहजिकच नेटकरी तिच्या या अदांवर जाम फिदा झाले असून त्यावर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

करोनाच्या या वैश्विक महामारीत आपले सिनेस्टार देखील घरीच अडकून पडले आहेत. तशीच लॉकडाउनमुळे घरीच असलेली रिंकू सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात आहे. विविध फोटो, व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.

रिंकूने नुकतंच वेब विश्वात पदार्पण केलं असून ‘हंड्रेड’ ही तिची पहिली वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. यात ती लारा दत्ता बरोबर एका वेगळ्याच भूमिकेत चमकत आहे. रिंकूचा हा वेगळा अंदाज तिच्या चाहत्यांना खूष करुन गेला आहे. तिच्या या वेब सीरिजमधील अभिनयाचंही कौतुक होतंय. इतकंच नव्हे तर ती लवकरच बॉलिवूडमध्येही पदार्पण करणार आहे. रिंकूच्या पहिल्या चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहे.

या व्हिडिओत क्रॉप टॉपमधली रिंकू एकदम ग्लॅमरस दिसतेय. ब्लॅक अँड व्हाईटमधील या फोटोला रिंकूच्या चाहत्यांनी मनसोक्त लाईक केलाय. पण रिंकू सध्या लॉकडाउनमध्ये करतेय काय असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर देखील तिने दिलेय.

रिंकू म्हणते, ‘मी घरी आईला कामात मदत करतेय, स्वयंपाक करतेय, चित्र काढतेय, वेब सीरिज बघतेय’. सैराटपासून काम करणारी रिंकू पुढे म्हणतेय, ‘सर्वांनाच ब्रेक हवा होता, पण तो असा ब्रेक अपेक्षित नव्हता’. त्याचसोबत चाहत्यांना तिने घरीच सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं. ‘प्रयत्न सोडू नका, सुरुवात ही नेहमी कठीणच असते, सुरक्षित राहा, फिट राहा’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.