E-Bike : महापालिका शाळेतील विद्यार्थ्याने टाकाऊ वस्तुंपासून तयार केली इंधनविरहीत ई-बाईक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विद्यालय थेरगाव येथील इयत्ता 10 वी तील विद्यार्थ्यांनी ऑटोमोबाईल या व्यवसाय शिक्षणा अंतर्गत पेट्रोल व डिझेल (E-Bike) यासारख्या महागड्या इंधनविरहीत चालणारी पर्यावरणाला पूरक असणारी ई बाईक तयार केली आहे.

थेरगाव येथील महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयात याबाईकसह विविध उपक्रमाचे उद्‌घाटन  महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त  प्रदीप जांभळे यांच्या हस्ते करण्यात आले. माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सी. टी. कदम, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टुवार, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर पवार, क्रीडा पर्यवेक्षक कन्हेरे, क्रीडा मार्गदर्शक बन्सी आटवे, फुगे अरुण, कृष्णराव टकले, संतोष शेडगे, रायफल शूटिंग कोच विजय रणझुंजारे, अंजली चौगुले  शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे म्हणाले, महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी  प्रत्येक अडचणींना तोंड देत विद्यार्थी दशेत मुलांनी सतत उपक्रमशील राहावे.(E-Bike) तसेच आयुष्यात प्रगतशील रहावे. स्वतः बरोबर समाज तसेच राष्ट्राची उन्नती साध्य करण्याचे ध्येय ठेवावे. यावेळी शाळेतील विविध उपक्रमास जांभळे यांनी भेट दिली व माहिती घेतली.  शाळेच्या प्रगतीबद्दल, शिस्त आणि क्रीडा क्षेत्रातील यश व नवनवीन उपयुक्त प्रकल्प तसेच नवीन क्षेत्र उपलब्धतेबद्दल विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचेही कौतुक केले.

Pimpri Corona Update : शहरात आज केवळ 8 नवीन रुग्णांची नोंद; 10 जणांना डिस्चार्ज

10 वी तील विद्यार्थ्याने पेट्रोल व डिझेल यासारख्या महागड्या इंधनविरहीत चालणारी पर्यावरणाला पूरक असणारी ई बाईक तयार केली आहे. ही बाईक टाकाऊ वस्तुंपासून तयार करण्यात आली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी  ई बाईकबद्दल माहिती सांगितली.(E-Bike) मागच्या चाकास हब मोटार लावून त्या मोटारला पॉवर देण्यासाठी 48 व्होल्टची लिथियम बॅटरीचा वापर केला आहे. आणि  बॅटरीचे कनेक्शन बाईकच्या मागील चाकाला बसविलेल्या हब मोटारला दिले आहे. ही बॅटरी वाहन चालत असतानाच चार्जिंग व्हावी म्हणून त्यावर सौरउर्जानिर्मितीचे पॅनलही जोडण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांनी आजच्या परिस्थितीत रोडवर होत असलेले अनेक अपघात टाळण्यासाठी उपायोजनाचे सुचवले आहे. त्या उपायोजनेमध्ये दोन बाइक मध्ये आपण जर सेंसर  बसवले आणि त्या सेंसरमध्ये गाडी जवळ आली की ,आपल्याला सेंसरद्वारे सूचना मिळेल व होत असलेले अपघात टाळता येतील.(E-Bike) कोणाचीही जीवितहानी होणार नाही. याबाबत सेन्सर वर संशोधन चालू असल्याचे ॲटोमोबाईल या तांत्रिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले.

यावेळी विद्यालयास वॉटर कुलर व प्युरिफायर प्रसव ऑटो कॉम प्रा.लि.चे मनिष जैन  यांनी भेट दिलेल्या स्टेनलेस स्टीलच्या 80 लिटरच्या वॉटर कुलरचे उद्‌घाटनही (E-Bike) अतिरिक्त आयुक्त जांभळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नव्याने तयार झालेल्या रायफल शूटिंग प्रकल्पासही भेट देऊन त्यांनी प्रसंशा केली. शाळेतील खेळाडू विद्यार्थ्यांसाठी राजेंद्र डिंबळे यांनी दिलेल्या 14 वर्षाखालील मुलींच्या संपूर्ण संघातील खेळाडूंना मोफत कीटचे वाटप करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.