Night school GR: रात्र शाळेची 2017ची अधिसूचना लागू करण्याची ‘मुप्टा’ची मागणी

एमपीसी न्यूज: राज्यातील रात्रशाळांच्या विकासाबाबत सर्वसमावेशक धोरण स्विकारल्याबद्दल “मुप्टा” या राज्यस्तरीय आक्रमक शिक्षक संघटनेने अर्धवेळ शिक्षक आणि अडीच तासांचा रात्रशाळेचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे.(Night school GR) दुबार शिक्षक अध्यापक कार्यक्षमतेने करत नाही तसेच अध्यापनाचा कालावधी हा साडेतीन तासांचा करावा. त्यामुळे अध्यापनाबरोबर त्याच्या इतर कौशल्यविकासावर ही भर देता येईल.2017 च्या निर्णयाने शाळांचा निकाल वाढलाच आहे. अध्यापनासाठी पूर्णवेळ शिक्षक उपलब्ध झाल्याने विद्यार्थी वर्गाची गुणवत्ता सुध्दा वाढल्याची नोंद सुध्दा आहे.तरी रात्रशाळेबाबत अभ्यास करुन याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

पश्चिम महाराष्ट अध्यक्ष प्राचार्य सतिश वाघमारे,संघटनेचे राज्य सचिव प्रा.सुनिल मगरे,पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी याबाबत निर्णय घेतांना रात्रशाळेचे प्रश्न व्यवस्थित समजून घेऊनच रात्रशाळेतील विद्यार्थी वर्गाच्या भविष्यासाठी निर्णय घ्यावे.ही भूमिका मांडली आहे.

मुप्टा संघटनेचे पुणे ग्रामिण जिल्हा अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे या प्रसंगी भूमिका मांडली आहे. ते म्हणाले,” रात्रशाळेसंबधीच 17 मे 2017 चा जिरा लागू करुन तातडीने 30 जून 2022 चा सिआर रद्द करावा. अशी मागणी मुप्टाच्यावतीने करण्यात येत आहे. या रात्रशाळेला अनेक मोठी परंपरा आहे.(Night school GR) शिक्षणापासुन वंचित असलेल्या सर्व वयोगटातील विद्यार्थी वर्गास आपले अपूर्ण राहिलले शिक्षण पूर्ण करता येते. तसेच रात्रशाळेतील हा विद्यार्थी गरिब, झोपडपट्टीतील, मागासवर्गीय वर्गातील ,मध्य वर्गातील व आर्थिक दुर्बल तसेच होतकरु घटकातील विद्यार्थी येथे आपले शिक्षण पूर्ण करत आलेला आहे.येथिल अर्धेवेळ शिक्षक वर्ग प्रामाणिक व तळमळीने सामाजिकभान ठेवून काम करत असतो.

Pimpri Corona Update:  शहरात आज 104 नवीन रुग्णांची नोंद; 85 जणांना डिस्चार्ज

दिवसाच्या शाळेच्या वेळेपेक्षा रात्री कमीवेळेत अध्यापन पूर्ण करुन त्यांची गुणवंता वाढविण्यासाठी झटत असतो.तरी यासाठी रात्रशाळेतील अनेक वर्ष काम करत असलेल्या सर्व अर्धेवेळ शिक्षकांना कायम स्वरुपी करुन तसेच कौशल्यपूर्वक अध्यापन करत असल्याने त्यांना पूर्णवेळेचा पगार ही देण्याची मागणी “मुप्टा” वतीने करण्यात येत आहे. दोन वेळा अध्यापन करणा-या शिक्षकांची कार्य क्षमता रात्रशाळेत शिकविण्यासाठी राहत नाही. दिवसभर अध्यापनांचा ताण इतर अनेक शैक्षणिक कामकाजामुळे तो रात्रशाळेच्या विद्यार्थी वर्गास न्याय देऊ शकत नाही.त्यामुळे दुबार नोकरी करणा-यांना शिक्षकांना रात्रशाळेत शिक्षक म्हणुन नियुक्त करणे म्हणजे रात्रशाळेच्या मुलांवर अन्यायच केल्याप्रमाणे होत आहे.

यामुळे गेली अनेक वर्ष रात्रशाळेत निस्वार्थ काम करणा-या अर्धेवेळ प्राध्यापक व शिक्षकांना कसलीही अट न टाकता. कायमस्वरुपी करावे.तसेच राञशाळेत शिकणा-या विदयार्थी वर्गास इ.8 वी इ.12 वी पर्यंत पाठ्यपुस्तक विनामुल्य मिळावी.तसेच शैक्षणिक फी पूर्ण माफ करावी.शिवाय दिवसभर काम करुन येत असल्याने त्यांना मध्याहन आहाराची व्यवस्था ही करण्यात यावी.(Night school GR) रात्रशाळेच्या परिसरातील असलेल्या सेवा सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.अनेक रात्रप्रशालेत महिला वर्ग ही शिक्षण घेत असतो.त्यांच्या सुरक्षितेसाठी कामे व्हावे.विद्यालयापर्यंत येण्याची प्रवासाची योग्य सोय व्हावी. रात्र शाळेत विद्यार्थी वर्गाची प्रचंड शिक्षण घेण्याची इच्छा असुन आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना विद्यालयात प्रवेश घेणे शक्य होत नाही.त्यामुळे ते शालाबाह्य होतात.अनेक अडचणीवर मात करत हे शिक्षण घेणारे विद्यार्थी असतात.संबधीत ज्या शहरात अशा प्रशाला आहेत तेथील महानगरपालिकाने दरवर्षी एक विशिष्ट निधी देण्याची तरतूद ही करावी.

सर्व शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना थेट आश्रमशाळेप्रमाणे शंभर टक्के अनुदानपाञ करावे. रात्रशाळेने अनेक विद्यार्थी वर्गाच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश देण्याचे काम केले आहे.(Night school GR) रात्रशाळेचा वेळ हा साडेतीन तासांचा करावा आणि रात्र शाळेतील शिक्षकांना पूर्णवेळ शिक्षक म्हणुन नियुक्ती करावी.रात्रशाळेचा विद्यार्थी सुध्दा एक भारताचा नागरिक आहे. रात्र शाळेतील अर्धेवेळ शिक्षक हा दिवसाकाम करणा-या शिक्षकांबरोबर तोच अभ्यासक्रम, सर्व शालेय मूल्यमापन साडेतीन तासातच करतो.शिवाय राञशाळेतील हा विद्यार्थी शिक्षकांपासुन वंचित झालेला असतो.त्याला गोडी लावून,त्यांच्या स्तरावर जाऊन शिकवत असतो.

 

येथे शिकणा-या विद्यार्थी वर्गाची वयोमर्यादा ही जादाची असते.दिवसभर काम करुन आलेला श्रमाने थकलेला विद्यार्थी असतो. त्याला अध्यापनात आवड निर्माण करुन शिकवतो.त्यामुळे वेळेपेक्षा त्यांचे जादाचे कौशल्य लागते.याचा ही विचार होणे आवश्यक आहे.एकच बोर्ड,एकच प्रश्नपञिका, एकच मूल्यमापन दिवसाप्रमाणे राञशाळेच्या मुलांचे धरले जाते.तरी राञशाळेचे विद्यार्थी या अध्यापकांमुळे सहज यशस्वी होताना दिसत आहे.(Night school GR) याकडे सर्वांनी जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.”प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे मुप्टा पुणे ग्रामिण जिल्हाअध्यक्ष यांनी व्यक्त केली. याबाबत लवकर कार्यवाही झाली नाही.2017 चा जिरा लागू केला नाही. आणि 30 जून 2022 चा जिआर रद्द केला नाही तर “मुप्टो”च्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात येईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.