Pimpri Corona Update:  शहरात आज 104 नवीन रुग्णांची नोंद; 85 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 104 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. (Pimpri Corona Update) तर, कोरोनामुक्त झालेल्या 85 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 628 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.(Pimpri Corona Update) शहरातील 3 लाख 69 हजार 688 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 489 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 474 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Biomedical waste : जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकणा-या आस्थापनांकडून 1 लाखाचा दंड वसूल

तर, 15 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये दाखल आहे. (Pimpri Corona Update) आज दिवसभरात 1 हजार 776 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 42 हजार 210 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.