Biomedical waste : जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकणा-या आस्थापनांकडून 1 लाखाचा दंड वसूल

एमपीसी न्यूज : ग्रीन मार्शल पथकांमार्फत सावर्जनिक ठिकाणी उघड्यावर जैववैद्यकीय घनकचरा टाकण्या-या आस्थापानावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.(Biomedical waste) या कारवाईत 1 लाख 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत आरोग्य व पर्यावरणच्या नियम भंगाबाबत उपायुक्त अजय चारठाणकर यांच्या आदेशानुसार ग्रीन मार्शल पथकांमार्फत सावर्जनिक ठिकाणी उघड्यावर जैववैद्यकीय घनकचरा टाकण्या-या आस्थापानावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.(Biomedical waste) पिंपळे-सौदागर येथील धनश्री मेडिकल, हेल्थ एक्यूरेट लॅब आणि औंध येथील शाश्वत हॉस्पिटल यांच्यावर  जैववैद्यकीय कचरा (बायोमेडिकल) वेस्ट उघड्यावर टाकल्याप्रकरणी कारवाई केली. प्रत्येकी 35 हजार रुपयांप्रमाणे 1 लाख 5 हजार रुपये दंड वसूल केला.

Pimpri Crime : गेल्या दोन दिवसात पिंपरी चिंचवड परिसरात तीन ठिकाणी चोरीला गेले मोबाईल

या कारवाई मध्ये सहा आरोग्य अधिकारी महेश आढाव,(Biomedical waste) आरोग्य निरीक्षक उमेश जाधव व लिपिक आकाश मडके, कर्मचारी रवी हटकर, गणेश थरकुडे, MSF जवान दशरथ घुले, महेश कदम,वैशाली कदम व तृतीय पंथीय पथक यांचा समावेश होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.