Talegaon : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दुचाकीला ट्रकने मागून जोरदार (Talegaon) धडक दिली ज्यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात गोळेवाडी येथील आंबी-निगडे रोडवर शुक्रवारी (दि.12) दुपारी घडला.

याप्रकरणी मारूती बाळू वारिंगे (वय 49 रा. वारंगवाडी, मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ट्रक क्रमांक एमएच 14 बीजे 6662 च्या अज्ञात चालकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.या अपघातात शिवाजी घमाजी वारिंगे यांचा मृत्यू झाला आहे.

MPC News Podcast 13 May 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चुलते शिवाजी वारिंगे व त्यांचा मित्र गेणुभाऊ राधुजी नखाते हे दोघे दुचाकीवरून जात असताना आरोपी त्याचा ट्रक भरधाव वेगाने घेऊन आला व त्याने शिवाजी यांच्या दुचाकीला जोरदाऱ धडक दिली.

अपघातानंतर ट्रक चालक तेथे न थांबता  तेथून पळून गेला. यात शिवाजी वारिंगे यांचा मृत्यू झाला तर गेणुभाऊ नखाते हे जखमी झाले आहेत यावरून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस आरोपीचा शोध घेत (Talegaon) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.