Nigdi : हिंदी संमेलनात जिज्ञासू नागरिकांनी जाणून घेतली प्राण्यांविषयी वैज्ञानिक माहिती

भारतीय प्राणी सर्वेक्षण केंद्राच्या प्रदर्शनात गर्दी

एमपीसी न्यूज – हिंदी दिवस निमित्त बालेवाडी येथे झालेल्या तिसऱ्या अखिल भारतीय राजभाषा (Nigdi) संमेलनात भारतीय प्राणी सर्वेक्षण पश्चिम केंद्र पुणे यांच्या वतीने प्रदर्शन केंद्र उभारण्यात आले. प्राणी, जीव जंतूंविषयी असलेल्या जिज्ञासेने अनेक नागरिकांनी या केंद्राला भेट देऊन प्राण्यांविषयी माहिती जाणून घेतली.

वरिष्ठ प्राणी वैज्ञानिक सहायक संदीप कुमार, वरिष्ठ प्राणी वैज्ञानिक सहायक उदय कुमार, कनिष्ठ प्राणी वैज्ञानिक सहायक गजानन साळुंके, ग्रंथालय तथा वैज्ञानिक सहायक प्रणीत लांडगे, नामदेव गभाले, सुनील साळुंके, संजय कुमार यादव आदींनी प्रदर्शन केंद्रात भेट देणाऱ्या नागरिकांना प्राण्यांविषयी सविस्तर माहिती  दिली.

Vishwakarma Yojana : 18 पारंपरिक व्यवसायांशी संबंधित पीएम विश्वकर्मा योजनेचा आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार प्रारंभ

आर्थिकदृष्ट्या महत्वपूर्ण असणारे किडे, माशी, फुलपाखरू, घोरपड, महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू अशा प्राण्यांचा समावेश प्रदर्शनात करण्यात आला. या प्राण्यांविषयी वैज्ञानिक माहिती सदर केल्यामुळे भारतीय प्राणी सर्वेक्षण केंद्राचे प्रदर्शन आकर्षण ठरले. भारतीय प्राणी सर्वेक्षण केंद्राद्वारे हिंदी भाषेतून प्रकाशित करण्यात आलेले शोधग्रंथ, मासिक पत्रिका तसेच खासदार अजय मिश्रा यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलेली ‘कोशिका’ ही पत्रिका देखील ठेवण्यात आली.

केरळचे राज्यपाल आरिफ मुहम्मद खान यांनी देखील या प्रदर्शन केंद्राला भेट दिली. भारतीय प्राणी सर्वेक्षण केंद्राद्वारे राबविल्या जात असलेल्या या उपक्रमांचे खान यांनी कौतुक केले.

भारतीय प्राणी सर्वेक्षण पश्चिम केंद्राचे कार्यालय प्रमुख डॉ. बासुदेव त्रिपाठी म्हणाले, हिंदी संमेलनात प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये प्राणीशास्त्र या विषयाची गोडी वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहेत. प्राण्यांविषयी वैज्ञानिक पद्धतीने माहिती देण्याचा आमचा हेतू आहे. भारतीय प्राणी सर्वेक्षण केंद्रातील शोधपत्र, पुस्तके आणि माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

भारतीय प्राणी सर्वेक्षण केंद्राच्या वैज्ञानिक ई डॉ. अपर्णा कलावटे म्हणाल्या, “भारतीय प्राणी सर्वेक्षण केंद्राच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट देऊन त्यांच्या मनातील प्राण्यांविषयीच्या शंकांचे आमच्याकडून निरसन केले. प्राण्यांविषयी वैज्ञानिक माहिती मिळाल्याने नागरिक हरखून गेले. नागरिकांच्या ज्ञानात भर पाडता आली याचा आम्हाला आनंद (Nigdi)  आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.