Nigdi : संक्रमणात समर्पण महत्त्वाचे – डॉ. सदानंद मोरे

एमपीसी न्यूज – “संक्रमणात समर्पण खूप महत्त्वाचे (Nigdi)असते. संक्रमण काळातील योगदान हे समाजाला दिशादर्शक असते. यासाठी साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे विचार ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

निगडी प्राधिकरण येथे रविवारी राजेंद्र घावटे लिखित आणि (Nigdi)पिंपरी – चिंचवड साहित्य मंच, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ, पिंपरी – चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती आयोजित ‘चैतन्याचा जागर’ या ग्रंथरूपी वैचारिक लेखसंग्रहाचे प्रकाशन करताना डॉ. मोरे बोलत होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

Pimpri : शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची पुण्यातील जबाबदारी सुनील पवार यांच्याकडे

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, प्रकाशक नितीन हिरवे, लेखक राजेंद्र घावटे, जयश्री घावटे, राज अहेरराव, राजाभाऊ गोलांडे, सुरेश कंक आणि साहित्य, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाजकारण, राजकारण अशा विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

डॉ. सदानंद मोरे पुढे म्हणाले की, “पिंपरी – चिंचवड ही औद्योगिकनगरी एका मोठ्या संक्रमणातून गेली आहे. आज ती साहित्य आणि संस्कृतीचीनगरी म्हणूनसुद्धा ओळखली जाते. या स्थित्यंतराला सामोरे जाताना वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असलेल्या व्यक्तींचे योगदान खूप महत्त्वाचे ठरले. अशा पार्श्वभूमीवर एक जागल्या म्हणून राजेंद्र घावटे यांचे साहित्य, समाज, संस्कृती, प्रबोधन याप्रति समर्पण उल्लेखनीय आहे. त्याचेच प्रतिबिंब ‘चैतन्याचा जागर’ या वैचारिक लेखसंग्रहात उमटले आहे! आपल्या चांगल्या परंपरा, सण-उत्सवाच्या संकल्पना आणि राष्ट्र व समाजाचे चिंतन हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.

पांडुरंग बलकवडे म्हणाले, “सामाजिक बांधिलकी अन् वैचारिक प्रगल्भता हे ‘चैतन्याचा जागर’ या संग्रहाचे वैशिष्ट्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे सुराज्य करण्याचे काम आपल्या देशातील विचारवंतांनी केले आहे. समाजाला वेळोवेळी येणाऱ्या वैचारिक ग्लानीच्या काळात अशा वैचारिक साहित्याने दीपस्तंभासारखे कार्य केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.