Pimpri : शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची पुण्यातील जबाबदारी सुनील पवार यांच्याकडे

एमपीसी न्यूज – शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पुणे जिल्हाप्रमुखपदी (Pimpri)सुनील पवार यांची निवड करण्यात आली आहे. वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून पवार हे उत्तमरित्या शिरूर आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांच्या रुग्णालयातील येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास माजी खासदार, उपनेते शिवाजीराव आढळराव यांनी व्यक्त केला.

बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून (Pimpri) राज्यातील गोरगरीब आणि गरजवंत, आर्थिक दुर्लभ घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात राखीव बेड उपलब्ध करून देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांना पूर्ण मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत करणे तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत करण्यात येते.

Maharashtra : अहमदाबाद डीआरआय, गुजरात पोलिसांची छत्रपती संभाजीनगर मध्ये कारवाई; 23 किलो कोकेन, 2.9 किलो मेफेड्रोन जप्त

महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थ सहाय्य व्हाये याकरिता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, तसेच अनेक ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्याचे काम या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून केले जाते.

शिवसेना उपनेते तथा कामगार नेते इरफान सय्यद म्हणाले की, सुनील पवार यांच्या निवडीने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातून कामगारांना व नागरिकांना वैद्यकीय मदत मिळण्यास नक्कीच मदत होईल. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मूळ संकल्पना तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना जास्तीत जास्त फायदा करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. जेणेकरून नागरिकांना शासकीय योजनांचा फायदा होऊ शकतो.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.