Maharashtra : अहमदाबाद डीआरआय, गुजरात पोलिसांची छत्रपती संभाजीनगर मध्ये कारवाई; 23 किलो कोकेन, 2.9 किलो मेफेड्रोन जप्त

एमपीसी न्यूज – महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) (Maharashtra) अहमदाबाद आणि गुजरात पोलिसांनी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे एका कारखान्यावर कारवाई केली. या कारखान्यात अंमली पदार्थ बनवले जात असल्याच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 23 किलो कोकेन आणि 2.9 किलो मेफेड्रोन तसेच 30 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाचा अहमदाबाद विभाग आणि (Maharashtra)अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचालनालयाने शुक्रवारी (दि. 20) महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात विविध ठिकाणी अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ संबंधी कायदा 1985 अंतर्गत शोधमोहीम राबवली. नंतर औरंगाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेनेही या कारवाईत सहकार्य केले.

Chinchwad : महात्मा फुलेनगर मधील श्री दुर्गा दौडला उस्फूर्त प्रतिसाद

यातील एका आरोपीच्या निवासी परिसराची झडती घेतल्यावर सुमारे 23 किलो कोकेन, सुमारे 2.9 किलो मेफेड्रोन आणि 30 लाख रुपये मूल्याच्या भारतीय चलनी नोटा जप्त करण्यात आल्या.

पैठण एमआयडीसीच्या औद्योगिक परिसरात महालक्ष्मी इंडस्ट्रीज या नावाचा मेफेड्रोन आणि केटामाइनचे उत्पादन करणारा कारखाना आढळून आला. या ठिकाणाहून एकूण 4.5 किलो मेफेड्रोन, 4.3 किलो केटामाइन आणि सुमारे 9.3 किलो वजनाचे मेफेड्रोनचे आणखी एक मिश्रण जप्त करण्यात आले.

या अंमली आणि मनोविकृतीकारक पदार्थांची बेकायदेशीर बाजारातील किमत 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याची नोंद केली गेली आहे. अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ संबंधी कायदा 1985 (NDPS 1985) च्या संबंधित तरतुदींनुसार हे सर्व पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणी एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदीनुसार मुख्य सूत्रधारासह दोन जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सिंथेटिक औषधांचा वाढता वापर आणि या औषधांच्या निर्मितीमध्ये औद्योगिक कारखान्यांचा गैरवापर ही गोष्ट महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) या कारवाईमुळे उघडकीस आली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.